scorecardresearch

Premium

IND vs BAN, Asia Cup: शुबमन गिलचे शतक व्यर्थ! बांगलादेशने अकरा वर्षानंतर रचला इतिहास, भारताचा सहा धावांनी पराभव

IND vs BAN, Asia Cup 2023: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या आशिया कपच्या सुपर-४ मधील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सहा धावांनी पराभव झाला. २०१२नंतर बांगलादेशने भारताला आशिया चषकात पराभूत केले.

IND vs BAN Asia Cup: Shubman Gill's century in vain Bangladesh created history after eleven years defeated India by six runs
२०१२नंतर बांगलादेशने भारताला आशिया चषकात पराभूत केले. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

IND vs BAN, Asia Cup 2023: आशिया चषक २०२३च्या शेवटच्या सुपर-४ सामन्यात भारताला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत २६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव २५९ धावांवर आटोपला आणि सहा धावांनी सामना गमावला. २०१२नंतर बांगलादेशने भारताला आशिया चषकात पराभूत केले. त्यांचा हा टीम इंडियाविरुद्ध दुसरा विजय आहे. शुबमन गिलची शतकी खेळी भारताला पराभवापासून वाचवू शकली नाही.

बांगलादेशने भारताचा पराभव केला

बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. या आशिया चषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे. मात्र, स्पर्धेच्या दृष्टिकोनातून या सामन्याचे महत्त्व नव्हते आणि टीम इंडिया १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. त्याचवेळी या विजयासह बांगलादेशचा प्रवास संपला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून २६५ धावा केल्या. कर्णधार शाकिब अल हसनने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तौहीद हृदयॉयने ५४ आणि नसूम अहमदने ४४ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध, अक्षर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Pakistan Vs Australia Practice Match Updates
PAK vs AUS: हैदराबादी बिर्याणीमुळे बिघडली पाकिस्तानची फिल्डिंग! पराभवानंतर शादाब खानने केला खुलासा, पाहा VIDEO
IND vs SL, Asia Cup: after Mohammad Siraj terrific performance Fans cried profusely after seeing the state of Sri Lanka see photos
IND vs SL, Asia Cup: सिराज फॉर्मात, चाहते कोमात! श्रीलंकेच्या पराभवानंतर फॅन्सना अश्रू अनावर, पाहा Video
IND vs BAN: In Asia Cup Shubman Gill brilliant 5th ODI century against Bangladesh crosses 1000 runs in 2023
IND vs BAN, Asia Cup: एक अकेला सब पे भारी! शुबमन गिलचे झुंजार शतक, वन डेमध्ये केल्या हजार धावा पूर्ण
Pakistan's decline in ODI rankings
Asia Cup 2023: पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला फायदा, फायनलपूर्वी श्रीलंकेने टीम इंडियाला दिली खास ‘भेट’

बांगलादेशने आशिया चषकात भारतावर एकमेव विजय २०१२ साली मिळवला होता आणि ११ वर्षानंतर भारतावर त्यांनी विजय मिळवला. या पराभवामुळे टीम इंडियाची नंबर १ बनण्याची संधी गेली. २०१२ साली देखील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतक (११४ धावा) ठोकले होते आणि तीन धावांनी पराभव झाला होता. आजच्या सामन्यातही शुबमन गिलने शानदार शतक केले आणि सहा धावांनी पराभव झाला.

हेही वाचा: IND vs BAN, Asia Cup: एक अकेला सब पे भारी! शुबमन गिलचे झुंजार शतक, वन डेमध्ये केल्या हजार धावा पूर्ण

२६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सर्व १० गडी गमावून २५९ धावाच करू शकला. शुबमन गिलने १२१ धावांची शानदार खेळी केली, पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. ४२ धावा करणारा अक्षर दुसरा सर्वोत्तम धावा करणारा ठरला. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने तीन बळी घेतले. महेदी हसन आणि तनझिम हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शाकिब आणि मेहदीने प्रत्येकी एक विकेट घेतली. सूर्यकुमार यादव (२६) आणि शुबमन यांनी ४५ धावांची भागीदारी केली खरी, परंतु सूर्याला फिरकीपटूंना स्वीप मारण्याचा मोह काही आवरता आला नाही आणि तो त्रिफळाचीत झाला. भारतीय संघ १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आशिया चषकमधील अंतिम सामना खेळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs ban highlights indias first defeat in this asia cup bangladesh defeated by six runs shubman gills century went in vain avw

First published on: 15-09-2023 at 23:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×