भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे. ढाका येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने केएल राहुलसोबत यष्टिरक्षक म्हणून जाण्याचा निर्णय घेतल्याने अनुभवी समालोचक हर्षा भोगले यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांना असे वाटते की, “भारत पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात त्याच्याकडे नियमित यष्टीरक्षक म्हणून पाहत असेल तर त्याने आतापासूनच आयपीएलसह सर्व विश्वचषकापर्यत होणाऱ्या सामन्यांमध्ये ही भूमिका बजावली पाहिजे.

काल जेव्हा भारतीय संघ पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरला तेव्हा केएल राहुल यष्टीरक्षकाच्या रुपात दिस्रला. तत्पूर्वी, ऋषभ पंतला संघातून मुक्त करण्यात आले असून तो कसोटी मालिकेसाठी संघात दाखल होणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली होती. मात्र त्यांच्या बदलीचा विचार झालेला नाही.

IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs PBKS: गुजरातला नकोसा ‘यश’, बंगळुरूसाठी मौल्यवान; कॉमेंट्रीदरम्यान कोणी केलं असं वक्तव्य?

भारताकडे ईशान किशनच्या रूपाने दुसरा यष्टिरक्षक असला तरी., तो दुर्दैवी राहिला. कारण असे काहीही मोठे किंवा न पटण्यासारखे नाही. असे असूनही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही यावर संघ व्यवस्थापनचं योग्य उत्तर देऊ शकते. रोहित शर्माने येथे केएल राहुलला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्थान दिले. यावर त्यांनी रोहितच्या डोक्यात नेमका कोणता विचार सुरु आहे यावर त्यांनी बोट ठेवले आहे.

यावर क्रिकेट तज्ज्ञ हर्षा भोगले यांनीही आपले मत मांडले. हर्षा ट्विटरवर म्हणाले, “एका बाजूला ऋषभला संघातून वगळण्यात आले तर दुसऱ्या बाजूला संघात संजू सॅमसन यष्टीरक्षणासाठी दुसरा पर्याय ठेवण्यात आला आहे. जेव्हा एखादा यष्टीरक्षक खेळाडू त्यांच्या संधी शोधत असतात तेव्हा त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असते. संघ व्यवस्थापनाने या सर्वाकडे दुर्लक्ष करत थेट केएल राहुलकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी सोपवली आणि मधल्या फळीत राहुलच्या पर्यायाकडे पुन्हा परतले आहेत. यासर्वांमध्ये ईशान किशन देखील रांगेत उभा असून यामुळे मी पुरता गोंधळलो आहे.”

यानंतर, समालोचक हर्षा भोगले यांनी या एपिसोडमध्ये आणखी एक ट्विट केले आणि त्यात लिहिले, “जर भारत दीर्घकालीन योजना म्हणून विश्वचषकात यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलकडे पाहत असेल, तर त्याला इथून पुढे प्रत्येक सामन्यात ठेवावे लागेल. अगदी आयपीएलमध्येही.” तत्पूर्वी, पहिल्या एकदिवसीय सामन्यात राहुलला येथे टी२० प्रमाणे सलामीची संधी मिळाली नाही. तो ६व्या क्रमांकावर बाद झाला आणि त्याने ७० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आणि टीम इंडियाला अडचणीत आणले. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघ ४२व्या षटकात सर्वबाद होण्यापूर्वी १८६ धावा करू शकला.