भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया तब्बल सात वर्षांनंतर बांगलादेशविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी आली आहे. आज, ४ डिसेंबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना शेर-ए-बांगला स्टेडियम, ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप पंतच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानुसार, ऋषभ पंत १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात सामील होऊ शकतो. तसेच, अनुभवी अष्टपैलू अक्षर पटेल दुसऱ्या वनडेमध्ये पंतच्या जागी खेळताना दिसला असता. परंतु बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षर पटेल पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नाही.

टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक –

भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे तर, या मालिकेदरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळले जातील. या मालिकेतील पहिला सामना आज (४ डिसेंबर) ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. तसेच यानंतर वनडे मालिकेतील दुसरा सामना या मैदानावर ७ डिसेंबरला, तर उभय संघांमधील तिसरा आणि अंतिम सामना १० डिसेंबरला चटगांव येथे खेळवला जाणार आहे.

पहिल्या वनडे सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना, १९ षटकांच्या समाप्ती नंतर ३ बाद ८९ धावा केल्या आहेत. शिखर धवन(७), रोहित शर्मा (२७) आणि विराट कोहली (९) तंबूत परतले आहेत. बांगलादेशकडून शाकिब हल हसनने दोन विकेट्स घेतल्या आहेत.श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल सध्या खेळपट्टीवर आहेत. दोघांमध्ये उपयुक्त भागीदारी झाली असून आता भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, शाहबाज अहमद, इशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चहर, अक्षर पटेल आणि यश दयाल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban indias wicket keeper batsman rishabh pant has been ruled out of the odi series due to injury vbm
First published on: 04-12-2022 at 13:18 IST