IND vs BAN Rohit Sharma Injured BCCI To Give Chance To This Player in Upcoming Test Cricket Umran Malik To Replace Shami | Loksatta

IND vs BAN: रोहित शर्माच्या जागी येत्या सामन्यात BCCI ‘या’ खेळाडूला देणार संधी, ‘हे’ गोलंदाजही बदलणार

IND vs BAN 3rd ODI व १४ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कसोटी सामान्यांचं मालिकेत रोहितची जागा कोण घेणार याविषयी माहिती समोर येत आहे.

IND vs BAN: रोहित शर्माच्या जागी येत्या सामन्यात BCCI ‘या’ खेळाडूला देणार संधी, ‘हे’ गोलंदाजही बदलणार
IND vs BAN: रोहित शर्माच्या जागी येत्या सामन्यात 'या' खेळाडूला देऊ शकतं संधी (फोटो: ट्विटर)

IND vs BAN 3rd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत काल भारताला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. बांगलादेश समोर खेळताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने अंगठ्याला दुखापत झाली असतानाही ५१ धावांची खेळी खेळून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला पण बांगलादेशने ५ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली आहे. या सामन्यात बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने दिलेल्या माहितीनुसार दुखापतीनंतर रोहित आता मायदेशी परतणार आहे. बांगलादेश विरुद्ध मालिकेतील तिसरा सामना हा १० डिसेंबरला चितगाव येथे होणार आहे. आता या सामन्यात व १४ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कसोटी सामान्यांचं मालिकेत रोहितची जागा कोण घेणार याविषयी माहिती समोर येत आहे.

रोहित शर्माच्या जागी कोण?

१४ डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळण्याची शकता आहे. अभिमन्यू ईश्वरनने सध्या सुरु असलेल्या ‘अ’ कसोटी मालिकेत एकावर एक शतके झळकावली आहेत तसेच तो सलामीवीर म्हणून उत्तम कामगिरी करता आहे. अशावेळी त्याला सिल्हेटमधील दुसरा ‘अ’ कसोटी संपल्यानंतर चट्टोग्रामच्या संघात सामील केले जाऊ शकते.” असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले आहे.

हे ही वाचा<< अंबानींकडून रिलायन्स जिओ प्रीपेड ग्राहकांना खास गिफ्ट; २२२ रुपयाचा ‘हा’ नवा रिचार्ज प्लॅन वाचवेल खर्च

टीम इंडियाच्या गोलंदाजांची फळीही बदलणार..

दरम्यान ईश्वरन रोहितच्या जागी संघात येत असला तरी कसोटी सामन्यात कर्णधार केएल राहुल आणि शुभमन गिल हे चट्टोग्राम आणि ढाका येथे भारतासाठी सामनावीर असतील असेही समजत आहे. तसेच भारत ‘अ’ साठी सातत्याने उत्तम कामगिरी करणारा बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार किंवा उमरान मलिक दुखापतग्रस्त मोहम्मद शमीची जागा घेऊ शकतात. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर एकही सामना न खेळलेला रवींद्र जडेजा आता कसोटी सामने खेळणार असल्याने भारताची गोलंदाजीची स्थितीही थोडी दुबळीच असू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 12:29 IST
Next Story
IND vs BAN: रोहितने दमदार खेळीने रचला मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसराच खेळाडू