scorecardresearch

Premium

IND vs BAN, Asia Cup: एक अकेला सब पे भारी! शुबमन गिलचे झुंजार शतक, वन डेमध्ये केल्या हजार धावा पूर्ण

IND vs BAN, Asia Cup 2023: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या आशिया कपच्या सुपर-४ मधील शेवटच्या सामनात टीम इंडिया संकटात सापडली आहे. मात्र, शुबमन गिलने शानदार शतक झळकावले.

IND vs BAN: In Asia Cup Shubman Gill brilliant 5th ODI century against Bangladesh crosses 1000 runs in 2023
शुबमन गिलने शानदार शतक झळकावले. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)

IND vs BAN, Asia Cup 2023: आज आशिया चषक २०२३चा शेवटचा सुपर-४ सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. १७ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २६५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया संकटात सापडली असताना स्टार फलंदाज शुबमन गिल धावून आला आणि त्याने शानदार शतक झळकावले. अजूनही तो फलंदाजी करत आहे. त्याने ११७ चेंडूत शतक झळकावले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुबमन गिलचे पाचवे शतक

शुबमन गिलने ११७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने आतापर्यंतच्या त्याच्या शतकी खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत. त्याचे वन डे कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे. त्याचबरोबर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडिया या सामन्यात कायम आहे. गिल व्यतिरिक्त कोणताही भारतीय फलंदाज विशेष काही करू शकलेला नाही. या डावात २६ धावा करणारा सूर्यकुमार दुसरा सर्वोत्तम धावा करणारा फलंदाज आहे. २०९ धावांवर भारताची सातवी विकेट पडली. शुबमन गिल १३३ चेंडूत १२१ धावा करून बाद झाला. मेहदी हसनने त्याला तौहित हृदयकरवी झेलबाद केले.

India Canada Dispute boAt Withdraws Sponsorship Of Punjabi Singer Shubh Virat Kohli Unfollows After Nijjar Killing Claim By PM
खलिस्थानचे समर्थन करणाऱ्या ‘या’ पंजाबी गायकावर boAt ची कारवाई; कोहलीने केलं अनफॉलो, नेमकी चूक काय?
Irfan Pathan and fans were furious after Sanju Samson was not selected in Indian squad
IND vs AUS: “जर मी संजूच्या जागी असतो तर…”; टीम इंडियात सॅमसनची निवड झाल्याने इरफान पठाण निराश, चाहत्यांचे BCCI रोहितवर गंभीर आरोप
IND vs BAN Asia Cup: Shubman Gill's century in vain Bangladesh created history after eleven years defeated India by six runs
IND vs BAN, Asia Cup: शुबमन गिलचे शतक व्यर्थ! बांगलादेशने अकरा वर्षानंतर रचला इतिहास, भारताचा सहा धावांनी पराभव
ireland apologizes for ads during ind vs ire t20 match dublin
भारत-आयर्लंड सामन्यात अश्लील मजकूर असणाऱ्या वेबसाईटची जाहिरात; आयर्लंडची बिनशर्त माफी!

कठीण परिस्थितीत दमदार खेळी करून संघाला सांभाळणे आणि तिथून संघाला बाहेर काढणे हे खूप कठीण काम असते. मात्र, अशावेळी जे हे असे काम करतो तोच खेळाडू महान होतो. हेच परिपूर्ण खेळाडूचे लक्षण असते. टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती आणि गिलही हळूहळू ती पूर्ण करत आहे. आशिया चषक २०२३च्या सुपर-४ सामन्यात बांगलादेश विरुद्ध एका बाजूने जेव्हा फलंदाज बाद होत होते तेव्हा शुबमन गिल तंबू ठोकून एकटा उभा राहून टीम इंडियाला विजयाचे दिशेने घेऊन जाण्यचा प्रयत्न केला. त्याचे हे शानदार शतक सर्वांच्याच स्मरणात राहील.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषक फायनलआधी श्रीलंकेला मोठा धक्का! ‘हा’अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे संघातून पडू शकतो बाहेर

२०२३मध्ये शुबमनची अप्रतिम कामगिरी

या स्पर्धेपूर्वी काही काळ वाईट अवस्थेतून जात असलेल्या शुबमन गिलने नेपाळ आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतके झळकावून पुनरागमन केले आणि आता शतकही केले. एवढेच नाही तर गिलने या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये १००० धावाही पूर्ण केल्या. गिलने अवघ्या १७ डावात हा आकडा गाठला. त्याच्याशिवाय या वर्षी इतर कोणत्याही फलंदाजाने १००० धावा केल्या नाहीत. एकूणच, गिलचे यंदाच्या तिन्ही फॉरमॅटमधील हे सहावे शतक आहे. त्‍याने टी२०आणि कसोटीमध्‍ये प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

आशिया कप स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या भारताच्या सर्वात युवा फलंदाजांमध्ये शुबमन चौथ्या क्रमांकावर आला. त्याने २४ वर्ष व ७ दिवसांचा असताना हे शतक झळकावले अन् महेंद्रसिंग धोनीचा २००८ ( २६ वर्ष व ३५४ दिवस) सालचा विक्रम मोडला. सुरेश रैना ( २१ वर्ष व २११ दिवस, २००८), सचिन तेंडुलकर ( २१ वर्ष व ३५० दिवस, १९९५) आणि विराट कोहली ( २३ वर्ष व १२९ दिवस, २०१२) हे आघाडीवर आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs ban shubman gills brilliant century indias score crosses 170 runs for six crosses 1000 runs in 2023 avw

First published on: 15-09-2023 at 22:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×