IND vs BAN Team India squad announced for 1st test match against Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी १६ सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या मधल्या फळीत सर्फराझ खानचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून विराट कोहली, केएल राहुल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतही कसोटी संघात पुनरागमन करणार आहेत. हे तिघेही इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत सहभागी झाले नव्हते. त्याचबरोबर आकाश दीप, सर्फराझ, ध्रुव जुरेल कायम ठेवले आहे. सतत फॉर्मशी झुंजत असलेल्या श्रेयस अय्यरला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळालेली नाही. दुलीप ट्रॉफीमध्येही त्याला विशेष काही करता आले नाही. याशिवाय श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक होती.

Sourav Ganguly says Rishabh Pant to become All Time Great in Test Cricket
IND vs BAN : गिल-जैस्वाल नव्हे तर ‘हा’ २६ वर्षीय खेळाडू भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज, सौरव गांगुलीचा दावा
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
Team India WTC final 2025 qualification scenario
WTC Final 2025 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण
IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin 6th century
IND vs BAN : रविचंद्रन अश्विनचे ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
IND vs BAN Team India squad announced for 2nd test match
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी? जाणून घ्या
Rishabh Pant Explains Why he Set Bangladesh Filed in IND vs BAN Chennai Test
IND vs BAN: “…म्हणून मी बांगलादेशची फिल्डिंग सेट केली”, ऋषभ पंतने अजय जडेजाचा उल्लेख करत दिलं मनं जिंकणारं उत्तर

ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन –

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टीम इंडियात दोन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांच्या स्थान मिळाले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतचा कार अपघात झाला होता. तेव्हापासून तो कसोटी संघाबाहेर होता. २०२२ मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तोही या पहिल्या कसोची सामन्यातून पुनरागमन करत आहे. याशिवाय केएल राहुल गरज पडल्यास विकेटकीपिंगही करू शकतो.

हेही वाचा – ‘मां कसम खाले नहीं लेगा सिंगल…’, लाइव्ह मॅचमध्ये ऋषभने कुलदीपला घ्यायला लावली शपथ, VIDEO व्हायरल

टीम इंडियात चार फिरकीपटूंचा समावेश –

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने चार फिरकीपटूंचा समावेश केला आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त मानली जाते. अशा परिस्थितीत जडेजा आणि अश्विन बांगलादेशच्या फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात.

हेही वाचा – Bajrang Punia Threat : ‘बजरंग काँग्रेस सोड अन्यथा…’, बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी; FIR दाखल

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.