खेळाडूंच्या दुखापती आणि तंदुरुस्तीच्या समस्यांना मागे सोडत भारतीय संघाचे शनिवारी चट्टोग्रामच्या मैदानामध्ये दमदार पुनरगाम केलं. पहिल्या डावामध्ये भारताचा सलामीवीर इशान किशन आणि विराट कोहलीने दमदार फटकेबाजी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. इशानने द्विशतक झळकावलं तर विराटने ७२ वं शकतं झळकावलं. विशेष म्हणजे आता सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट केवळ सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. विराटने ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टींगच्या ७१ शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटने हे ऐतिहासिक शतक षटकार मारत झळकावलं हे ही तितकेच विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिखर धवन आठ चेंडूंमध्ये तीन धावा करुन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि इशान किशनने २९० धावांची भागीदारी केली. यादरम्यान इशानने १३१ चेंडूंमध्ये २४ चौकार आणि १० षटकांच्या मदतीने इशानने २१० धावा केल्या. इशानला उत्तम साथ देणाऱ्या विराटनेही आपलं ७२ वं शतक साजरं केलं.

विशेष म्हणजे हे दोघेही टी-२० क्रिकेटप्रमाणे वेगाने खेळत होते. त्यामुळेच विराटनेही ९१ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि दोन षटकार लगावले. यापैकी एक षटकार तर त्याने एक षटकार त्याने ९७ धावांवर असताना लागवला. ८३ चेंडूंमध्ये विराटने शतक झळकावलं.

नक्की पाहा >> शब्दांवाचून कळले सारे… विराटचं ऐतिहासिक शतक अन् अनुष्काची Insta Story… पतीसाठी अनुष्काने पोस्ट केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

इबादत हुसैन गोलंदाजी करत असलेल्या ३९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराटने अखूड टप्प्याचा चेंडू फाइन लेगवरुन थेट सीमेपार धाडला. विराटच्या पायावर टाकलेला चेंडू त्याने इतक्या अलगद मनगटी फटका खेळत लेग साईडला षटकार लगावला की गोलंदाही क्षणभर हा फटका पाहतच राहिला. या षटकाराबरोबरच विराटने ऑगस्ट २०१९ नंतर प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. हे विराटचं एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील ४४ वं तर एकूण ७२ वं शतक ठरलं.

नक्की पाहा >> …अन् विराट कोहली मैदानातच इशान किशन समोर करु लागला भांगडा; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील Video तुफान Viral

तुम्हीच पाहा विराटचा हा षटकार…

शतक झळकावल्यानंतर आठ चेंडू खेळून संघाची धावसंख्या ३४४ असताना आणि वैयक्तिक धावसंख्या ११३ असताना कोहली झेलबाद झाला. शकीब उल हसनच्या फिरकी गोलंदाजीवर विराट मेहंदीकरवी झेलबाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban video virat kohli completing his 72th century with six scsg
First published on: 10-12-2022 at 15:14 IST