शब्दांवाचून कळले सारे... विराटचं ऐतिहासिक शतक अन् अनुष्काची Insta Story... पतीसाठी अनुष्काने पोस्ट केलेला 'तो' फोटो चर्चेत | ind vs ban virat kohli celebrated his 72nd century wife actress Anushka Sharma Special Instagram Story for husband scsg 91 | Loksatta

शब्दांवाचून कळले सारे… विराटचं ऐतिहासिक शतक अन् अनुष्काची Insta Story… पतीसाठी अनुष्काने पोस्ट केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

मागील बराच काळापासून विराटला कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयश येत असल्याने त्याच्यावर टीका केली जात होती

virat kohli Anushka
अनुष्काने इनस्ता स्टोरीवर पोस्ट केला फोटो (फोटो -लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

virat kohli celebrated his 72nd century Anushka Sharma insta story: भारतीय क्रिकेट चाहते मागील तीन वर्षांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर बांगलादेशविरुद्धच्या तिसरा एकदिवसीय सामन्यामधील पहिल्या डावामधील ३९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रत्यक्षात अवतरला. इबादत हुसैनने विराट कोहलीच्या पायावर टाकलेला चेंडू विराटने मनगटांचा वापर करुन अलगद शॉर्ट फाइन लेगला टोलला आणि चेंडू थेट सीमेपार जाऊन स्थिरावला. पंचांनी षटकार दर्शवणारा इशारा केला अन् हा षटकार क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरला गेला. यामागील कारण म्हणजे विराटने हा षटकार मारला तेव्हा तो ९७ धवांवर खेळत होता. या षटकारासहीत त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील आपलं ४४ वं आणि एकंरदित ७२ वं शतकं साजरं केलं. या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावरुन विराटवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही इन्स्ताग्रामवरुन एक खास पोस्ट केली आहे.

पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिखर धवन आठ चेंडूंमध्ये तीन धावा करुन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि इशान किशनने २९० धावांची भागीदारी केली. यादरम्यान इशानने १३१ चेंडूंमध्ये २४ चौकार आणि १० षटकांच्या मदतीने इशानने २१० धावा केल्या. इशानला उत्तम साथ देणाऱ्या विराटनेही आपलं ७२ वं शतक साजरं केलं.

विशेष म्हणजे हे दोघेही टी-२० क्रिकेटप्रमाणे वेगाने खेळत होते. त्यामुळेच विराटनेही ९१ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि दोन षटकार लगावले. यापैकी एक षटकार तर त्याने एक षटकार त्याने ९७ धावांवर असताना लागवला. ८३ चेंडूंमध्ये विराटने शतक झळकावलं. विराटने या शतकासहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. सध्या विराटच्या पुढे या यादीमध्ये केवळ १०० शतकांचा विक्रम नावावर असणारा सचिन तेंडुलकरच आहे.

नक्की पाहा >> Video: याला म्हणतात किंग कोहलीचा राजेशाही थाट! खणखणीत Six ने साजरं केलं ७२ वं शतकं; हा शॉट गोलंदाजही पाहतच राहिला

विराटने या षटकारासहीत रिकी पॉण्टींगचा ७१ शतकांचा विक्रम मोडीत काढला. विराटच्या शतकानंतर अनुष्काने टीव्हीवर विराट हसत हसत बॅट उंचावून शतकाचा आनंद साजरा करत असतानाच्या क्षणाचा फोटो पोस्ट केला आहे. भिंतीवर लटकवलेल्या वॉल माऊंटेड टीव्हीवर सामाना पाहताना काढलेल्या या फोटोत विराट हसताना दिसतोय.

या फोटोवर अनुष्काने दोन हृदयाच्या इमोंजीमध्ये १०० असा आकडा लिहिला आहे. या शिवाय अनुष्काने या पोस्टमध्ये काहीही लिहिलेलं नाही. मात्र २०१९ नंतर थेट २०२२ च्या शेवटच्या महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक साजरं करणाऱ्या पतीचं अनुष्काने या इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने अभिनंदन केलं आहे.

नक्की पाहा >> …अन् विराट कोहली मैदानातच इशान किशन समोर करु लागला भांगडा; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील Video तुफान Viral

विराटच्या कामगिरीचा अंदाज यावरुनच येईल की सध्या सक्रीय असलेल्या खेळाडूंपैकी सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमधील दुसरं नाव हे इंग्लंडच्या जो रुटचं. रुटच्या नावावर ४४ म्हणजेच जवळजवळ विराटच्या एकूण शतक संख्येच्या अर्धीच शतक संख्या आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (४४ शतकं), वॉर्नरचा सहकारी स्टीव्ह स्मिथ (४१ शतकं) आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४१ शतकं) या चौघांचा टॉप पाचमध्ये समावेश आहे.

मागील बराच काळापासून विराटला कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयश येत होतं. या बॅडपॅचमध्ये अनुष्का खंबीरपणे विराटच्या पाठीशी उभी राहिली. विराटनेच याबद्दल एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती. दोन वर्षांहून अधिक काळापासून त्याच्या नावावर कसोटी, टी-२० किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाही शतकाची भर पडली नव्हती. मात्र ८ सप्टेंबर २०२२ रोजी आशिया चषक स्पर्धेत विराटने अफगाणिस्तानविरुद्ध आपलं ७१ वं शतकं साजरं केलं आणि आज यामध्ये एकाने भर टाकत पॉण्टींगला मागे टाकलं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 17:04 IST
Next Story
IND vs BAN 3rd ODI: जय-वीरूची जोडी! इशान किशन आणि विराट कोहलीने रचला नवा इतिहास