IND vs ENG 3rd ODI Match Live Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. पहिला वनडे सामना भारताने तर दुसरा वनडे सामना इंग्लंडने जिंकल्याने ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा वनडे सामना महत्त्वाचा असणार आहे. या लॉर्ड्सवरील सामन्याची नाणेफेक इंग्लंडने जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, यासह भारतीय संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. पाहूया कशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन.
दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान रोहित शर्मा लॉर्ड्सच्या मैदानावर त्याचा अखेरचा सामना खेळणार असल्याचा रिपोर्ट समोर आला होता. पण या सामन्यापूर्वी बीसीसीआयने ही माहिती खोडून काढत रोहित शर्मा भारतासाठी खेळत राहणार असल्याची माहिती दिली. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्माला धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे या सामन्यात रोहितवर सर्वांच्या खास नजरा असणार आहेत.
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये या सामन्यासाठी तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे या सामन्याच्या सिलेक्शनसाठी उपलब्ध नसल्याची माहिती गिलने दिली. याशिवाय केएल राहुल प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला आहे. तर शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर संघाबाहेर झाले आहेत. त्यामुळे प्रिन्स यादव व अर्शदीप सिंग या गोलंदाजांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर इंग्लंडच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल असून साकिब महमूदच्या जागी जोश टंगला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
भारताची लॉर्ड्स वनडेसाठी प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, गस ॲटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग
