Yashasvi Jaiswal equals Virat Kohli’s record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सोमवारी रांचीत पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव करत मालिकेत ३-१ ने अजेय आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघासाठी दुसऱ्या डावात ३७ धावाचे योगदान देत कोहलीच्या ‘विराट’ विक्रमाशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल विराट कोहलीसह संयुक्त पहिल्या क्रमाकांवर पोहोचला आहे.

जैस्वालची विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी –

इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने ४४ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. यानंतर जो रूटच्या चेंडूवर जेम्स अँडरसनने यशस्वी जैस्वालचा अप्रतिम झेल घेतला त्यामुळे यशस्वी जैस्वालला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मात्र, यशस्वी जैस्वालने विराट कोहलीसाऱ्यात दिग्गज खेळाडूच्या खास यादीत स्थान मिळवले आहे. यशस्वी जैस्वालने या मालिकेत ६५५ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ६५५ धावा केल्या होत्या.

Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
list of fastest bowlers in IPL 2024 and whole History
उमरान मलिकचा विक्रम मोडणार मयंक यादव? IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? पाहा यादी
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी –

अशा प्रकारे धरमशाला कसोटीत विराट कोहलीला मागे टाकण्याची यशस्वी जैस्वालला संधी आहे. यशस्वी जैस्वाल अवघी १ धाव घेतल्यानंतर विराट कोहलीला मागे सोडेल. यशस्वी जैस्वालसाठी ही मालिका खूपच खास राहिली आहे. या मालिकेत आतापर्यंत यशस्वी जैस्वालने २ द्विशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने दोनदा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहेत. दोघांच्या नावावर ६५५ धावा आहेत.

हेही वाचा – IND vs ENG : रजत पाटीदारवर निवड समिती मेहेरबान का? मालिकेतील खराब प्रदर्शनानंतर चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय –

विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालनंतर राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ६०२ धावा केल्या होत्या. विराट कोहली पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१८ मध्ये ५९३ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर विजय मांजरेकर आहेत. विजय मांजरेकरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ५८६ धावा केल्या होत्या. हा पराक्रम त्यांनी १९६१ मध्ये केला होता.

हेही वाचा – IND vs ENG : भारताच्या युवाशक्तीचा विजय; चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली

चौथ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लंड संघाने भारतीय संघापुढे १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आज चौथ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता ४० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर, एकेकाळी १२० धावसंख्येवर भारताचे ५ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. इंग्लिश फिरकीपटू भारतासाठी मोठे आव्हान बनले होते, पण गिल आणि जुरेलच्या भागीदारीने इंग्रजांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. शुबमन गिल आणि ध्रुव जुरेलने नाबाद ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत सामना जिंकवला. जुरेल ३९ धावांवर नाबाद राहिला आणि शुबमन ५२ धावांवर नाबाद राहिला.