IND vs ENG 4th T20I Live Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना ब्रिस्टलमध्ये खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडने १४व्या षटकात ९ विकेट्स राखून सोपा विजय नोंदवला. या सामन्यातील विजयासह इंग्लंडने पहिल्यांदाच भारताविरूद्ध टी-२० मालिका जिंकली आहे. हॅरी ब्रुक व फिल सॉल्ट यांची शतकी भागीदारी सामन्यात महत्त्वाची ठरली.
इंग्लंड विजयाच्या दिशेने
भारताने तिसऱ्या षटकात जोस बटलरला माघारी धाडत चांगली सुरूवात केली. पण त्यानंतर फिल सॉल्ट व हॅरी ब्रुक यांनी वादळी फटकेबाजी केली. ब्रुकने २१ चेंडूत चौकार-षटकारांची आतिषबाजी करत वादळी अर्धशतक झळकावलं. यासह आता १० षटकांत इंग्लंडच्या १२० धावा पूर्ण झाल्या असून संघाला विजयासाठी ६० चेंडूत ३९ धावांची गरज आहे.
भारताने इंग्लंडला विजयासाठी किती धावांचं लक्ष्य दिलं?
जोफ्रा आर्चरच्या अखेरच्या षटकात भारताने फक्त ४ धावा करत २ विकेट्स गमावल्या. यासह भारताने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या आहेत. यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यरच्या ८० धावांचं महत्त्वाचं योगदान आहे. श्रेयस अय्यरने ४९ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. यासह इंग्लंडला विजयासाठी आता १५९ धावंचं आव्हान देण्यात आलं आहे.
कर्णधार श्रेयस अय्यरचं शानदार अर्धशतक
कर्णधार श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरला असून मैदानावर पाय घट्ट रोवून उभा आहे. श्रेयसने १४व्या षटकात दणदणीत षटकार खेचत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने ३३ चेंडूत ३ चौकार ३ षटकारांसह अर्धशतक झळकावलं.
शिवम दुबे झेलबाद
श्रेयस अय्यरसह अर्धशतकी भागीदारी रचल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिवम दुबे झेलबाद झाला. यासह १४ षटकांत भारताने ३ बाद १०४ धावा केल्या आहेत.
अभिषेक शर्मा, इशान किशन, वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद
वैभव सूर्यवंशी चांगल्या सुरूवातीनंतर १५ धावांवर स्वस्तात बाद होत माघारी परतला. तिसऱ्या षटकात आर्चरच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. तर पाचव्या षटकात इशान किशनला जोश टंगने बाद केलं. तर सातव्या षटकात अभिषेक शर्माही आदिल रशीदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यासह ७ षटकांत भारताने ३ विकेट्स गमावत ५० धावा केल्या आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्याची नाणेफेक भारताने जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह इंग्लंडचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात केली आहे. भारताने चौथ्या टी-२० सामन्यासाठी संघात दोन मोठे बदल केले आहेत. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती हे दोघेही संघाबाहेर झाले आहेत; दोघांनाही हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून, ते संपूर्ण मालिकेतूनच बाहेर पडल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
हर्षित आणि वरुण यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसनला पुन्हा एकदा संघात स्थान मिळवता आले नाही. नाणेफेकीचा विचार करता, श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली आणि यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताची चौथ्या टी-२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग.
