India vs England 5th T20I Match Timing: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर मालिकेतील पुढील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील चौथा टी-२० सामना ब्रिस्टलच्या मैदानावर पार पडला. हा सामना भारतीय संघाने ९ गडी राखून गमावला. यासह इंग्लंडने या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आता इंग्लंडकडे शेवटचा सामना जिंकून व्हॉइटवॉश करण्याची संधी असणार आहे. दरम्यान शेवटचा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना ११ जुलै, शनिवारी खेळवला जाणार आहे. हा सामना साऊथॅम्पटनच्याा द रोज बाऊल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजेच, ६:३० वाजता होईल. मालिकेतील चौथा सामना रात्री १० वाजता सुरु झाला होता. हा सामना ३ तासांआधी सुरु होणार आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल.
लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता.यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. पण जर तुमच्याकडे सब्सक्रिप्शन नसेल, तर तुम्ही हा सामना डीडी स्पोर्ट्सवर फ्री मध्ये पाहू शकता.
भारत- इंग्लंड टी-२० मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, प्रसिध कृष्णा, सूर्यांश शेडगे, वाॉशिंग्टन सुंदर.
या मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), टॉम बँटन, जेकब बेथेल, सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, आदिल राशिद, जोश टंग, जॉर्डन कॉक्स, सोनी बेकर, ल्यूक वुड, साकिब महमूद, रेहान अहमद, जेम्स कोल्स.
