IND vs ENG Edgbaston Test : प्रशिक्षकानेच दिला श्रेयस अय्यरला धोका! कसा ते वाचा

आयपीएलच्या गेल्या हंगामात ब्रेंडन मॅक्युलम कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रशिक्षक होता. तर, श्रेयस अय्यर संघाचा कर्णधार होता.

Shreyas Iyer
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली एजबस्टन कसोटी रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. भारताने आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली आहे. मात्र, भारताच्या दुसऱ्या डावादरम्यान श्रेयस अय्यरच्या माजी प्रशिक्षकानेच त्याच्यासाठी जाळे विणल्याचे निदर्शनास आले.

एजबस्टन येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी श्रेयस अय्यर १९ धावांवर बाद झाला. सुरुवातीला एक-दोन चांगले फटके मारल्याने तो खेळपट्टीवर जम बसवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत होते. मात्र, मॅथ्यू पॉट्सने एक आखूड चेंडू टाकून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पॉट्सने त्याचा बळी मिळवला असला तरी त्यामागे इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमचा हात होता. विशेष म्हणजे मॅक्युलम इंडियन प्रिमीयर लीगमध्ये श्रेयस अय्यरचाही प्रशिक्षक होता.

आयपीएलच्या गेल्या हंगामात ब्रेंडन मॅक्युलम कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रशिक्षक होता. तर, श्रेयस अय्यर संघाचा कर्णधार होता. आयपीएलदरम्यान मॅक्युलमला अय्यरच्या फलंदाजीमधील उणीवांची पूर्ण कल्पना आली असणार यात शंका नाही. याचाच फायदा त्याने सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात घेतला आहे.

पुजारा बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या अय्यरने काही उत्कृष्ट फटके मारून खेळण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान, गॅलरीमध्ये बसलेल्या इंग्लिश प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने आपल्या गोलंदाजांना आखूड चेंडू फेकण्याचा इशारा केला. त्याची ही कृती कॅमेऱ्यातही कैद झाली. यानंतर ६०व्या षटकात मॅथ्यू पॉट्सने पहिलाच चेंडू आखूड टाकून श्रेयस अय्यरला अँडरसन करवी झेलबाद केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs eng edgbaston test former kkr coach brendon mccullum plots shreyas iyer dismissal vkk

Next Story
IND vs ENG Edgbaston Test : इंग्लंडचा पराभव निश्चित? मायदेशात करावा लागणार आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग
फोटो गॅलरी