इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून (१ जुलै) एजबस्टन येथे होत आहे. या कसोटीदरम्यान ब्रॉडकास्टर एक अनोखा प्रयोग करण्याची तयारी करत आहेत. शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडचा खेळाडू ओली पोपच्या हेल्मेटवर कॅमेरा लावला जाणार आहे. या प्रयोगाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांनी मान्यता दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एजबस्टन कसोटी सामन्यासाठी स्काय स्पोर्ट्स अधिकृत प्रसारक आहे. या सामन्यात प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूच्या हेल्मेटवर कॅमेरा लावला जाणार आहे. या ठिकाणी ओली पोप क्षेत्ररक्षण करत असतो. या कॅमेऱ्यात आवाज कैद होणार नाही. स्कायने यापूर्वी गेल्या वर्षी ‘द हंड्रेड’च्या पहिल्या हंगामामध्ये असाच प्रयोग केला होता. यष्टिरक्षक फलंदाज टॉम मूर्सने हेल्मेटवर कॅमेरा लावला होता.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test Live : निर्णायक कसोटी सामन्यात दोन्ही संघांचा लागणार कस; नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार एजबस्टनच्या मैदानावर गुरुवारी (३० जून) इंग्लंड संघाच्या नेट सरावावेळी याची चाचणी करण्यात आली. बिग बॅश लीगमध्येही असा प्रयत्न झाला होता. तेव्हा फलंदाजांच्या हेल्मेटवर कॅमेरे बसवण्यात आले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng edgbaston test ollie pope to field at short leg with camera on helmet vkk
First published on: 01-07-2022 at 14:47 IST