scorecardresearch

IND vs ENG Hockey WC 2023: भारत आणि इंग्लंडमधील रोमांचक सामना अखेर अनिर्णीत; १२ पेनल्टी कॉर्नरवर एकही गोल नाही

IND vs ENG Updates: दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यासह दोघांनाही प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. दोन्ही संघांनी आपले पहिले सामने जिंकले आहेत. भारताचा पहिला सामना स्पेन विरुद्ध झाला, ज्यात स्पेनचा २-० ने पराभव झाला.

IND vs ENG Hockey WC 2023: भारत आणि इंग्लंडमधील रोमांचक सामना अखेर अनिर्णीत; १२ पेनल्टी कॉर्नरवर एकही गोल नाही
भारत विरुद्ध इंग्लड (फोटो-ट्विटर)

IND vs ENG Hockey Match: एफआयएच हॉकी विश्वचषक २०२३ मधील भारतीय संघाचा दुसरा सामना इंग्लंडसोबत अनिर्णित राहिला. पहिल्या सामन्यात स्पेनविरुद्ध विजय मिळवणाऱ्या टीम इंडिया इंग्लंडला हरवून सलग दुसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरली होती, मात्र तसे झाले नाही. या सामन्यात १२ पेनल्टी कॉर्नरवर एकही गोल झाला नाही. त्यामुळे सामना ०-० असा बरोबरीत सुटला. तसेच दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर सामधान मानावे लागले.

भारताचा पुढील सामना १९ जानेवारी होणार आहे. या सामन्यात भारताला वेल्स संघाचे आव्हान असणार आहे. उप-उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी या सामन्यात टीम इंडियाला विजय आवश्यक असणार आहे.

कॉमनवेल्थमध्ये पण सामना बरोबरीत सुटला होता –

यापूर्वी हे दोन्ही संघ राष्ट्रकुल स्पर्धेत आमनेसामने आले होते. तो सामना ४-४ असा बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांमधील मागील पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर भारताने दोन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर एक सामना इंग्लंडच्या नावावर राहिला आहे. उर्वरित दोन सामने अनिर्णित राहिले. दोन्ही संघांमध्ये नेहमीच निकराची लढत झाली आहे.

भारताचा जबरदस्त पलटवार –

या सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने जबरदस्त पलटवार केला. सामन्याच्या २३व्या आणि २५व्या मिनिटाला भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. मात्र, भारताच्या आक्रमणाने इंग्लंड संघाला नक्कीच अडचणीत आणले होते.ज्यामुळे इंग्लंडचे आक्रमण थोडेसे कमकुवत झाले होते.

हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: विराटने पुल शॉटवर खणखणीत षटकार लगावतचा हिटमॅनने केले अभिनंदन, पाहा VIDEO

तिसरा क्वार्टरही भारताच्या नावावर राहिला –

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने शानदार खेळ केला आणि आक्रमणे सुरूच ठेवली. मात्र, इंग्लंडने शानदार बचाव करत एकही गोल होऊ दिला नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने गोल करण्याच्या दोन उत्तम संधी निर्माण केल्या, मात्र त्याचे रुपांतर करता आले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 21:34 IST

संबंधित बातम्या