How Many Runs England Need to Score to Avoid Follow on in 2nd Test: इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहेत. पहिल्या दोन्ही दिवसांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे. बर्मिंगहममध्ये, कर्णधार शुबमन गिलच्या २६९ धावांच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभारला आहे. भारतीय संघाने इतकी मोठी धावसंख्या उभारली आहे की इंग्लंडच्या खेळाडूंवर नक्कीच दडपण आणणारी आहे.

भारताने पहिल्याच डावात इतक्या धावा केल्या आहेत की संघाला दुसऱ्यांदा फलंदाजीची गरजच लागणार नाही. यासाठी भारताला इंग्लंडला लवकर सर्वबाद करावं लागणार आहे. याचा पाया भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्याच दिवशी रचला आहे. इंग्लंडला लवकरात लवकर ऑल आऊट करून त्यांना फॉलोऑन देणं हे संघांचं मुख्य लक्ष्य असेल. त्यामुळे आता इंग्लंडला फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावा कराव्या लागतील, जाणून घेऊया.

इंग्लंडला पहिल्या डावात झटपट बाद करण्याची तयारी भारताने दुसऱ्याच दिवशी सुरू केली आहे. भारताने दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे ३ विकेट्स मिळवले आहेत. आकाशदीपने एका षटकात बेन डकेट आणि ऑली पोप यांना शून्यावर माघारी धाडंलं. तर सिराजने जॅक क्रॉलीला स्वस्तात माघारी धाडलं. यासह इंग्लंडने दुसऱ्या दिवशी २० षटकांत ३ बाद ७७ धावा केल्या आहेत आणि भारताकडे ५१० धावांची मजबूत आघाडी आहे.

इंग्लंडला फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची गरज?

भारताने पहिल्या ५८७ धावा केल्या आहेत. त्यामुळे फॉलोऑन टाळण्यासाठी, इंग्लंडला पहिल्या डावात ३८८ धावा कराव्या लागतील. यापेक्षा कमी धावांवर इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला तर टीम इंडिया त्यांना फॉलोऑन देऊ शकते. म्हणजेच इंग्लंडला लगेच पुढील डावात फलंदाजी करावी लागू शकते.

फॉलोऑन म्हणजे नेमकं काय?

फॉलोऑन हा कसोटी क्रिकेटमधील एक नियम आहे. फॉलो-ऑनचा वापर मोठ्या स्वरूपाचे क्रिकेट फॉरमॅट म्हणजेच कसोटी आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये केला जातो, जिथे प्रत्येक संघाला पारंपारिकपणे दोनदा फलंदाजी करावी लागते. या सामन्यांमध्ये, किमान तीन डाव पूर्ण झाल्यानंतरच निकाल ठरवता येतो.

फॉलोऑनमध्ये दुसऱ्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विरोधी संघ पहिल्या डावानंतर लगेचच दुसरा डाव खेळण्यास सांगू शकतो. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावांच्या लीडमधील फरक २०० धावांपेक्षा जास्त असेल तर फॉलो-ऑन नियम लागू होऊ शकतो. म्हणजेच आता इंग्लंडला ५८७ धावांपेक्षा २०१ धावा कमी म्हणजेच ३८८ धावा फॉलोऑन टाळण्यासाठी कराव्या लागतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रिकेटमधील नियम १४.२ मध्ये सांगितलं आहे “कर्णधाराने फॉलो-ऑनचा पर्याय लागू करण्याच्या त्याच्या निर्णयाची माहिती विरोधी संघाच्या कर्णधाराला आणि पंचांना देणं आवश्यक असत. एकदा पंच आणि विरोधी संघाच्या कर्णधाराला सांगितल्यानंतर निर्णय बदलता येत नाही.” आता इंग्लंडचा संघ तिसऱ्या दिवशी कशी फलंदाजी करणार आणि भारताच्या गोलंदाजांवर सर्वांची नजर असेल.