India vs England 2nd T20I Highlights in Marathi: जेकब बेथेलच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर इंग्लंड संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ४ गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याआधी भारताला आयर्लंडविरुद्ध सलग पराभवांचा सामना करावा लागला होता आणि आता इंग्लंडने विजयासह टी-२० मालिकेची सुरुवात केली आहे. कर्णधार म्हणून आपला पहिला सामना जिंकण्याची संधी श्रेयसच्या हातातून पुन्हा एकदा हुकली. सामन्यात नेमकं काय काय घडलं, पाहूया.
IND vs ENG 2nd T20I Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स
इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात एक षटक राखून ४ विकेट्सने भारतावर सोपा विजय मिळवला आहे. भारताच्या हातात असलेला हा सामना १७व्या षटकात मात्र हातातून निसटला. इंग्लंडच्या जेकब बेथलने इंग्लंडच्या विजयात मोठी भूमिका बजावली. जेकब बेथलने ४६ चेंडूत ५ चौकार-५ षटकारांसह ७६ धावांची मॅचविनिंग खेळी केली. रवी बिश्नोईच्या १७व्या षटकात जेकब बेथलने ३ षटकार व २ चौकार लगावत २९ धावा कुटल्या. रवी बिश्नोईचे २ बॅकफूट नो बॉल संघाला चांगलेच भारी पडले.
IND vs ENG 2nd T20I Live: रवी बिश्नोईच्या षटकार फिरला सामना
रवी बिश्नोईच्या १७व्या षटकाने सामना पूर्ण फिरवला. भारताच्या हातात असलेला सामना १७व्या षटकात हातातून निसटला. रवी बिश्नोईच्या बॅकफूट नो बॉलने भारताला चांगलाच दणका दिला. रवी बिश्नोईने या सामन्यात दोन नो बॉल टाकले आणि फ्रि हिटवर बिश्नोईने २ षटकार मारले. याशिवाय अजून एक षटकार व चौकार लगावत या षटकात त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि २९ धावा कुटल्या. यासह आता इंग्लंडला विजयासाठी १८ चेंडूत २० धावांची गरज आहे.
IND vs ENG Live:इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत! विल जॅक्स स्वस्तात परतला माघारी
इंग्लंडला पाचवा मोठा धक्का बसला आहे. विल जॅक्स अवघ्या ९ धावा करुन माघारी परतला आहे.
IND vs ENG Live: टॉम बँटन झेलबाद
अर्शदीप सिंगने १३व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर टॉम बँटनला झेलबाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. बँटन ३९ धावा करत बाद झाला.
IND vs ENG Live: बैंटन-बेथलने सावरला डाव
हॅरी ब्रुकच्या विकेटनंतर टॉम बँटन व जेकब बेथल यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ६७ धावांची भागीदारी साकारली.
IND vs ENG Live: हॅरी ब्रुक परतला माघारी
अक्षर पटेलच्या पाचव्या षटकात हॅरी ब्रुक माघारी परतला. अक्षरने टाकलेला चेंडू ब्रुकच्या ग्लोव्हजला लागून किपरच्या हातात गेला आणि तितक्यात इशान किशनने झेलबाद झाल्याचं अपील केलं. पंचांनी वाईड चेंडू देताच इशानच्या सांगण्यावरून श्रेयसने रिव्ह्यू घेतला आणि हॅरी ब्रुक झेलबाद झाला. यासह भारताला महत्त्वाची विकेट मिळाली.
IND vs ENG Live: हॅरी ब्रुकचं वादळ
हॅरी ब्रुकने दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर २७ धावा कुटल्या. बेथलने पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन ब्रुकला स्ट्राईक दिली. त्यानंतर त्याने २ चौकार व ३ षटकार लगावत २७ धावा कुटल्या.
IND vs ENG Live: वरूणचा कमालीचा झेल
अर्शदीप सिंगने जोस बटलरला बाहेर जाणारे चेंडू टाकत सेट केलं आणि अचानक स्विंग चेंडू पायात टाकत त्याला अडकवलं. बटलरने फ्लिक केलेला चेंडू वरूण चक्रवर्तीच्या डोक्यावर जात होता, पण त्याने हवेत झेप घेत कमालीचा झेल टिपला आणि संघाला पहिल्या षटकात दुसरी विकेट मिळाली.
IND vs ENG Live: भारताची दणक्यात सुरूवात
भारताने दिलेल्या 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फिल सॉल्ट व जोस बटलरची जोडी मैदानावर उतरली. तर अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरूवात करत पहिल्याच चेंडूवर सॉल्टला झेलबाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. इशान किशनने विकेटच्या मागे कमालीचा झेल टिपला.
तिलक वर्माने अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची आतिषबाजी करत भारताला १९० धावांचा पल्ला गाठून दिला. १८व्या षटकापर्यंत टीम इंडियाने १६२ धावाच केल्या होत्या. त्यानंतर १९व्या षटकात अक्षर पटेल झेलबाद झाला आणि जोश टंगच्या अखेरच्या चेंडूवर हर्षित राणाने षटकार खेचला. त्यानंतर २० व्या षटकात जोफ्रा आर्चर गोलंदाजीला आला. आर्चरच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार खेचले आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तर अखेरच्या चेंडूवर हर्षित राणा झेलबाद झाला. यासह भारताने २० षटकांत ७ बाद १९० धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी १९१ धावांचं आव्हान दिलं.
IND vs ENG Live: इशान किशनचं अर्धशतक हुकलं
१८व्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर इशान किशन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत उंच उडाला आणि तो झेलबाद झाला. यासह इशान किशन ४९ धावांवर झेलबाद झाल्याने त्याचं अर्धशतक हुकलं. यासह भारताच्या धावांना ब्रेक लागला आहे.
IND vs ENG Live: शिवम दुबे झेलबाद
सॅम करनने १६व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शिवम दुबेला झेलबाद करत टीम इंडियाला चौथा धक्का दिला आहे. यासह संघाने १६ षटकांत ४ बाद १४६ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या धावांवर नियंत्रण ठेवलं आहे.
IND vs ENG: वैभव सूर्यवंशीचा पदार्पणासह वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
श्रेयस अय्यर लियाम डॉसनच्या षटकात मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. श्रेयस २२ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ३७ धावांची खेळी केली. १३ षटकांत भारताने ३ बाद १३० धावा केल्या आहेत.
IND vs ENG 2nd T20I Live: भारताच्या १०० धावा पूर्ण
भारताने ११व्या षटकात १०० धावांचा पल्ला पार केला आहे. याशिवाय श्रेयस व इशानने अर्धशतकी भागीदारीदेखील साकारली आहे.
IND vs ENG Live: १० षटकांत भारताने किती धावा केल्या?
वैभव-अभिषेक बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी संघाचा डाव सावरला आहे. यासह १० षटकांत भारताने २ बाद ९६ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर १४ धावा तर इशान किशन १८ धावांवर खेळत आहे.
Abhishek Sharma wicket: अभिषेक शर्मा झेलबाद
पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा झेलबाद झाला. अभिषेकने या सामन्यात आधीच ३ चौकार मारले होते आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो ४३ धावांवर माघारी परतला. यासह भारताने पॉवरप्लेमध्ये ६५ धावा केल्या.
IND vs ENG Live: वैभव सूर्यवंशी बाद
पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी १४ धावांवर बाद झाला. पाचव्या षटकात विल जॅक्स गोलंदाजीला आला आणि जॅक्सच्या पाचव्या चेंडूवर पुढे येऊन फटका खेळायला वैभव चुकला. चेंडू थेट विकेटकीपरच्या हातात गेला आणि स्टंपिंग होत वैभव सूर्यवंशी बाद झाला. निराश होत वैभव माघारी परतला. वैभवने पहिल्याच सामन्यात १० चेंडूत २ षटकारांसह १४ धावा केल्या आहेत.
अभिषेक शर्मा व वैभव सूर्यवंशीच्या जोडीने २९ चेंडूत अर्धशतकी भागीदारी साकारली आहे. वैभवने १४ तर अभिषेकने ३० धावांचं योगदान दिलं आहे.
जोफ्रा आर्चर व वैभव सूर्यवंशी यांच्यातील लढत पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक होते. तिसऱ्या षटकात वैभव व आर्चर आमनेसामने आले. वैभवने पहिल्याच चेंडूवर गुडघा टेकत मागच्या बाजूला षटकार खेचला.
IND vs ENG live updates: वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली धाव
वैभव सूर्यवंशीने दुसऱ्या षटकात जोश टंगच्या गोलंदाजीवर एक धाव घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांचं खातं उघडलं. मँचेस्टरच्या खेळपट्टीमध्ये गोलंदाजांना मदत असल्याचं दिसत आहे. यासह भारताने २ षटकांत १० धावा केल्या आहेत.
IND vs ENG Live: भारताच्या डावाला सुरूवात
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला असून पदार्पणवीर वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्माची जोडी मैदानावर उतरली आहे. तर जोफ्रा आर्चरने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं टीम इंडियात ऐतिहासिक पदार्पण! महान सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत इतिहास घडवला
IND vs ENG live updates: इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, जोश टंग
IND vs ENG Live: भारताची प्लेईंग इलेव्हन
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्षित राणा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
IND vs ENG Toss: नाणेफेक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली आहे आणि संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह श्रेयस अय्यरने संघातील मोठा बदलही जाहीर केला आहे.
Vaibhav Sooryavanshi Debut: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण
वैभव सूर्यवंशीने अखेरीस भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. वैभव सूर्यवंशी भारतासाठी पदार्पण करणारा इतिहासातील सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. तिलक वर्माने त्याला पदार्पणाची कॅप दिली.
IND vs ENG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण झाल्यास कोणाच्या जागी खेळणार?
मँचेस्टरमधून रवी शास्त्री यांनीही वैभव सूर्यवंशीचं पदार्पण होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. वैभव सूर्यवंशी व संजू सॅमसन यांची बॉडी लँग्वेज पाहता वैभव आज पदार्पण करू शकतो आणि तो संजूच्या जागी खेळण्याची शक्यता आहे, अशी माहिती रवी शास्त्री यांनी दिली.
वैभव सूर्यवंशी दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे. वैभव दुसऱ्या टी-२० सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी मुख्य खेळपट्टीसमोर सराव करताना दिसला आहे. याशिवाय तो मैदानावरही प्रशिक्षकांबरोबर वॉर्म अप करताना दिसत आहे.
IND vs ENG live: सामना कुठे लाईव्ह पाहता येणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना सोनी स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर मोबाईलवर सोनी लिव्ह व जिओ हॉटस्टार या अॅपवर लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल.

IND vs ENG Live Score, India vs England 2nd T20I Match Highlights: भारताला पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला.
