अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा मराठमोळा खेळाडू कौशल तांबेने अप्रतिम झेल घेत सर्वांना थक्क केले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगउलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ १८९ धावांत आटोपला.

राज बावा आणि रवी कुमार यांनी जबरदस्त वेगवान गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. शतकी पल्ला गाठण्यापूर्वीच इंग्लंडचे सात शिलेदार तंबूत परतले होते. त्यानंतर जेम्स रियूने इंग्लंडसाठी धावा केल्या. त्याने ९५ धावांची खेळी केली. शतक पूर्ण करण्यापूर्वी तो रवी कुमारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रियूने पुल शॉट खेळला, सीमारेषेवर असलेल्या कौशलने दोन प्रयत्नात हा चेंडू टिपला. दुसऱ्या प्रयत्नात हातातून निसटलेला चेंडू कौशलने सूर मारत टिपला. त्याच्या या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल

हेही वाचा – IPL 2022 Mega Auction: अंडर १९ वर्ल्डकपमधील ‘हे’ दोन मराठी क्रिकेटर होणार करोडपती?

या सामन्यात कौशलने पाच षटकात २९ धावा देत एक बळी टिपला. त्याने यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स हॉर्टनला बाद केले. हॉर्टनने १० धावा केल्या.