Team India Batters Performance in IND vs IRE 1st T20I: आयपीएलमधील सपाट आणि फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या ‘पाटा’ ट्रॅकवर धावांचे डोंगर उभं करणारे, षटकारांचा पाऊस पाडणारे आपले तथाकथित ‘शेर’ अक्षरश: फेल ठरले. भारताच्या या फलंदाजांची आयर्लंडसारख्या देशात, जिथे चेंडूला खणखणीत बाऊन्स, वेग आणि स्विंग मिळतो, तिथे खेळायला जातात, तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झालेली पाहायला मिळाली. आयपीएलच्या झगमगाटात कोट्यवधी रुपयांची बोली लागणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खऱ्या खेळपट्ट्यांची परीक्षा सुरू झाल्यावर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणारे हे खेळाडू पाहून क्रिकेटप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’सारख्या नियमांमुळे आणि गोलंदाजांसाठी काहीही मदत नसलेल्या खेळपट्ट्यांमुळे या फलंदाजांचे रेकॉर्ड्स कागदावर भलेही मोठे वाटत असले, तरी खऱ्याखुऱ्या आव्हानांसमोर ते पार ढेर होतात, हेच सध्या पाहायला मिळालं. आयर्लंडसारख्या टी-२० मध्ये १२व्या क्रमांकावर असलेल्या संघाने वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. आयर्लंडचा क्रिकेट इतिहासात भारताचा हा पहिलाच विजय आहे. पण या विजयानंतर भारताच्या फलंदाजी फळीचं पितळ जणू उघडं पडलं आहे.

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताच्या अनेक प्रमुख फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. संजू सॅमसन (५) श्रेयस अय्यर (३), तिलक वर्मा (१९), वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांना मोठी खेळी करता आली नाही, तर संजू सॅमसन आणि इशान किशनलाही प्रभाव पाडता आला नाही. परिणामी भारताला ऐतिहासिक पराभवाचा सामना करावा लागला.

मात्र, याच खेळाडूंनी IPL 2026 मध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली होती. इशान किशनने १८२.४२ चा स्ट्राईक रेट आणि ६ अर्धशतकांसह ६०२ सर्वाधिक धावा केल्या. संजू सॅमसनने २ शतकांसह ४७७ धावा केल्या होत्या तर श्रेयस अय्यरने १ शचतक आणि ५ शतकांच्या बळावर शानदार हंगाम गाजवला. तिलक वर्माने ३५९ धावा केल्या, ज्यामध्ये १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश होता. वॉशिंग्टन सुंदरने ३ अर्धशतकं करत गुजरातसाठी ३७७ धावा केल्या होत्या. तर शिवम दुबेने २७० धावा करत आक्रमक फलंदाजी केली.

भारताच्या फलंदाजांची आयपीएल आणि आयर्लंड सामन्यातील कामगिरी

खेळाडूआयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यातील कामगिरीIPL 2026 मधील कामगिरी
संजू सॅमसन५ धावा, स्ट्राईक रेट -१२५.००४७७धावा, स्ट्राईक रेट-२६५.६३, २ शतकं, १ अर्धशतक
इशान किशन१ धाव, स्ट्राईक रेट – २०.००६०२ धावा, स्ट्राईक रेट-१८२.४२, ६ अर्धशतकं
श्रेयस अय्यर३ धावा, स्ट्राईक रेट – ४२.००४९८ धावा, स्ट्राईक रेट-१६८.८१, १ शतक, ५ अर्धशतकं
तिलक वर्मा१९ धावा, स्ट्राईक रेट – ९०.४८३५९ धावा, स्ट्राईक रेट-१४५.९३, १ शतक, २ अर्धशतकं
वॉशिंग्टन सुंदर९ धावा, स्ट्राईक रेट – ७५.००३७७ धावा, स्ट्राईक रेट-१५०.२०, ३ अर्धशतकं
शिवम दुबे१९ धावा, स्ट्राईक रेेट – १७८.५७२७० धावा, स्ट्राईक रेट-१५८.८२