Abhishek Sharma Named Unwanted Record: भारत आणि जपान या दोन्ही संघांमध्ये मैत्रापूर्ण सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीला आलेला अभिषेक शर्मा गोल्डन डकवर माघारी परतला. अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या ३० चेंडूंमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावलं होतं. पण पहिल्यांदाच जपानचा सामना करत असलेला अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यासह त्याच्या नावे एक नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.
अभिषेक शर्माने या नकोशा रेकॉर्डमध्ये रोहित शर्माला टाकलं मागे
या सामन्यात गोल्डन डकवर बाद होताच, अभिषेक शर्माने रोहित शर्माला मागे टाकलं आहे.अभिषेक शर्मा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाच वर्षांत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधी टी-२२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस शू्न्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड हा राशिद खानच्या नावावर होता. राशिद खान आणि पाकिस्तानचा शादाब खान हे दोघेही ९- ९ वेळा शू्न्यावर माघारी परतले होते. यासह अभिषेक शर्माच्या नावे आणखी एका नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस पहिल्याच चेंडूवर शू्न्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. रोहित शर्मा ४ वेळा गोल्डन डकवर माघारी परतला होता. तर अभिषेक शर्मा बाद ५ वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे भारतीय सलामीवीर फलंदाज
अभिषेक शर्मा – ५ वेळा
रोहित शर्मा- ३ वेळा
संजू सॅमसन – ३ वेळा
केएल राहुल – २ वेळा
मुरली विजय – १ वेळा
भारतीय संघाचा दमदार विजय
या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ षटकांत ३२ धावा केल्या. यादरम्यान अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. तर संजू सॅमसनने ९ आणि शेवटी श्रेयस अय्यरने १६ धावा केला. या धावांचा पाठलाग करताना जपानला ३० धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला.
