IND vs NAM T20 WC 2026 Match Timing: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली आहे. पहिला सामना अमेरिकेविरूद्ध झाला होता, या सामन्यात टीम इंडियाने २९ धावांनी विजय नोंदवला. सूर्यकुमार यादव व मोहम्मद सिराज यांनी या सामन्यात मॅचविनिंग कामगिरी केली होती. आता टीम इंडियाचा पुढील सामना कधी खेळवला जाणार, सर्व माहिती जाणून घेऊया.
अमेरिकाविरुद्धच्या सामन्यातून भारताने धडा घेतला असल्यामुळे नामिबिया साधारण संघ असं टीम इंडियाला म्हणून चालणार नाही. गतविजेत्या भारतीय संघाला अमेरिकेने चांगलाच दणका दिला. संघाने झटपट विकेट्स गमावल्या. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना असमान उसळी आणि टर्न मिळत होता, तेव्हा अमेरिकेने एकेकाळी ६ बाद ७७ अशी भारताची अवस्था होती. टीम इंडिया संकटात असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत १० चौकार व ४ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली.
सूर्यकुमार यादवने एकहाती बचावात्म चांगली धावसंख्या उभारली आणि यजमान संघाला २० षटकांत ९ बाद १६१ अशी मजल मारून दिली. नंतर, मोहम्मद सिराज (३/२९), अर्शदीप सिंग (२/१८) आणि अक्षर पटेल (२/२४) या त्रिकुटाने अमेरिकेला केवळ १३२ धावा करू दिल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.
भारत-नामिबिया सामना किती वाजता सुरू होणार?
भारताचा पुढील सामना आता नामिबियाशी होणार आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील अ गटातील हा सामना १२ फेब्रुवारी गुरूवार रोजी संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. हा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियममध्ये होणार असून संध्याकाळी ६.३० वाजता सामन्याची नाणेफेक होईल. तर भारत आणि नामिबिया सामना स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर तर जिओ हॉटस्टार या अॅपवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहायला मिळणार आहे.
टी-२० विश्वचषकासाठी भारत आणि नामिबियाचे संघ
भारत
सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर
नामिबिया
गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्झ, रुबेन ट्रम्पेलमन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, मालन क्रुगर, निकोल लॉफ्टी-ईटन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, जेसी बाल्ट, डिलन लीच्टर, डब्ल्यूपी मायबर्ग, मॅक्स हिंगो.
राखीव: अलेक्झांडर वोल्शेंक.
