India vs Namibia Live Score: भारतीय संघाने नामिबिया संघावर दणदणीत विजय मिळवत सुपर-८चा मार्ग सुकर केला आहे. नामिबियाचा टीम इंडियाने तब्बल ९३ धावांनी पराभव केला. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील सर्वात मोठा विजय आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २०९ धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात नामिबियाचा संघ १८.२ षटकांत ११६ धावांवर सर्वबाद झाला.
India vs Namibia Highlights, T20 WC 2026: भारत विरूद्ध नामिबिया सामन्याचे हायलाईट्स
भारताचा नामिबियावर दणदणीत विजय, टीम इंडियाचे गोलंदाज ठरले गेमचेंजर; हार्दिक-इशान-वरूण ठरले स्टार
बुमराहने केलं क्लीन बोल्ड
बुमराहने १७व्या षटकात ट्रंपलमॅनला क्लीन बोल्ड करत संघाला सातवी विकेट मिळवून दिली आहे.
T20 WC Live: नामिबियाला सहावा धक्का
अक्षर पटेल १३वं षटक टाकण्यासाठी आला, त्याच्या या षटकात क्रुगर झेलबाद झाला. क्रुगर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत उंच उडाला आणि जसप्रीत बुमराहने धावत येत एक उत्कृष्ट झेल टिपला. यासह टीम इंडियाला सहावी विकेट मिळाली.
IND vs NAM Live: नामिबियाचा निम्मा संघ तंबूत
नामिबियाला ८८ धावांवर पाचवा धक्का बसला आहे.
IND vs NAM Live: वरूण समोर नामिबियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो!
वरूण चक्रवर्तीने नामिबियाला चौथा धक्का दिला आहे.
IND vs NAM Live: काय बॉल टाकलाय! वरूणच्या फिरकीवर लॉरेनची दांडी गुल
वरूण चक्रवर्तीने नामिबियाला दुसरा धक्का दिला आहे. लॉरेन २९ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs NAM Live: नामिबियाला पहिला मोठा धक्का! जॅन फ्रिलिनक स्वस्तात परतला माघारी
या सामन्यात २१० धावांचा पाठलाग करण्यासाठी नामिबियाला पहिला मोठा धक्का बसला आहे. जॅन फ्रिलिनक स्वस्तात माघारी परतला आहे.
India vs Namibia Live: इशान- हार्दिकची तुफान फटकेबाजी! भारताने नामिबियासमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
या सामन्यात भारतीय संघाकडे मोठी धावसंख्या करण्याची संधी होती. पण शेवटी विकेट्स गेल्यामुळे भारतीय संघाला २० षटकांअखेर ९ गडी बाद २०९ धावा करता आल्या आहेत. नामिबियाला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या आहेत.
IND vs NAM Live: अर्धशतक झळकावल्यानंतर हार्दिक पांड्या बाद
हार्दिक पांड्याने ५२ धावांची दमदार खेळी केली. पण अर्धशतक झळकावल्यानंतर त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.
India vs Namibia: तिलक वर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद! अवघ्या इतक्या धावा करत परतला माघारी
तिलक वर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला आहे. तो अवघ्या २५ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs NAM Live: भारतीय संघाला तिसरा धक्का! इशान नंतर सूर्यकुमार यादव परतला माघारी
भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळाली आहे. पण अर्धशतक झळकावल्यानंतर इशान किशन बाद झाला. तर सूर्यकुमार यादव १२ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs NAM Live: ६,६,६,६,४., इशान किशनकडून चौकार- षटकारांचा पाऊस! झळकावलं दमदार अर्धशतक
सलामीला आलेल्या इशान किशनने चौकार षटकारांचा पाऊस पाडून २० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs NAM Live: वर्ल्डकप पदार्पणात संजू सॅमसन फ्लॉप! स्वस्तात परतला माघारी
संजू सॅमसनला पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली. पण तो अवघ्या २२ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs NAM Live Score: टॉस
या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये २ बदल करण्यात आले आहे. अभिषेक शर्माला विश्रांती देण्यात आली असून संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराहचं पुनरागमन झालं आहे.
[caption id="attachment_5697129" align="alignnone" width="670"]<img class="size-medium wp-image-5697129"
India vs Namibia Highlights, ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत विरूद्ध नामिबिया यांच्यात दिल्लीत सामना खेळवला गेला, या सामन्याचे हायलाईट्स
