India vs Netherlands Highlights T20 WC 2026: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६च्या गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. नेदरलँड्सने भारताला या सामन्यात कडवी झुंज दिली. पण भारताच्या खेळाडूंनी बाजी मारली. शिवम दुबे भारताच्या विजयाचा हिरो ठरला. तर गोलंदाजीत वरूण चक्रवर्तीने आपल्या फिरकीची जादू दाखवली. भारताचा आता सुपर-८ टप्प्यातील पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे.

Live Updates

IND vs NED T20 WC 2026 Highlights: भारत आणि नेदरलँड्स टी-२० वर्ल्डकप सामन्याचे हायलाईट्स

22:46 (IST) 18 Feb 2026

भारतीय संघ अजिंक्य! नेदरलँड्सवर मिळवला शानदार विजय; शिवम दुबे-वरूण चक्रवर्ती ठरले गेमचेंजर

IND vs NED: भारताने नेदरलँड्सविरूद्ध गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यात शानदार कामगिरी करत विजय मिळवला. ...सविस्तर वाचा
22:43 (IST) 18 Feb 2026
IND vs NED Live: अखेरच्या षटकात दोन झेल सुटले

अखेरच्या षटकात शिवम दुबे गोलंदाजीला आला. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर दुसऱ्या चेंडूवर सूर्या व रिंकू एकमेकांवर धडकताना वाचले आणि सूर्याच्या छातीवर चेंडू आदळला. त्यानंतर तिलक वर्माकडून झेल सुटला. त्यानंतर अखेरीस चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टनने झेल टिपला.

22:18 (IST) 18 Feb 2026

IND vs NED T20 WC Live: बुमराहने कॅप्टनला केलं क्लीन बोल्ड

जसप्रीत बुमराह १६व्या षटकात गोलंदाजीला आला. या षटकात त्याने पाचव्या चेंडूवर नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला क्लीन बोल्ड केलं.

22:12 (IST) 18 Feb 2026

IND vs NED live: बास डी लीडेची मोठी विकेट

शिवम दुबेने १५व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बास डी लीडेला झेलबाद करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर लीडेने मोठे फटके खेळले, पण अखेरच्या चेंडूवर दुबेने त्याला झेलबाद केलं.

22:03 (IST) 18 Feb 2026

IND vs NED Live: वरूणच्या खात्यात २ विकेट्स

वरूण चक्रवर्ती १३वं षटक टाकण्यासाठी आला. वरूणने पहिलाच चेंडू गुगली टाकला, यावर एकरमन मोठा फटका खेळायला गेला आणि सीमारेषेजवळ रिंकू सिंहकरवी झेलबाद झाला. तर आर्यन दत्तला पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. यासह नेदरलँड्सने १३ षटकांत ४ बाद ९९ धावा केल्या.

21:44 (IST) 18 Feb 2026

IND vs NED Live: भारताच्या खात्यात दुसरी विकेट

हार्दिक पंड्याने आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर लेविटला झेलबाद केलं. यासह भारताला दुसरी विकेट मिळाली आहे आणि नेदरलँड्सने २ विकेट्स गमावत ८ षटकांत ५२ धावा केल्या आहेत.

21:31 (IST) 18 Feb 2026

IND vs NED Live: वरूणने संघाला मिळवून दिला ब्रेकथ्रू

वरूण चक्रवर्तीला पॉवरप्लेमधील अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी दिली. त्याने षटकातील चौथ्या चेंडूवर नेदरलँड्सचा सलामीवीर मॅक्स ओ'डाऊडला क्लीन बोल्ड केलं. यासह पॉवरप्लेमध्ये संघाने १ विकेट गमावत धावा केल्या आहेत.

21:22 (IST) 18 Feb 2026

IND vs NED Live: नेदरलँड्सची चांगली सुरूवात

भारताने दिलेल्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सने ४ षटकांत २२ धावा केल्या आहेत. बुमराह व अर्शदीप यांनी २-२ षटकं टाकली आहेत.

20:51 (IST) 18 Feb 2026
IND vs NED T20 WC Live: भारताने उभारला धावांचा डोंगर

१३व्या षटकात ११० धावांवर ४ विकेट्स अशी संघाची स्थिती असताना हार्दिक व शिवमने संघाचा डाव सावरला. शिवम व हार्दिकने ७६ धावांची भागीदारी रचत संंघाला २० षटकांत १९३ धावांपर्यंत पोहोचवलं. पॉवरप्लेमध्ये भारताचे दोन्ही फलंदाज माघारी परतले होते.

त्यानंतर तिलक वर्मा ३१ धावा करत झेलबाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यादेखील ३४ धावा करत माघारी परतला. यानंतर शिवम दुबे व हार्दिक पंड्याने संघाचा डाव उचलून धरला. शिवमने या सामन्यात ३१ चेंडूत ४ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने २१ चेंडूत ३ षटकारांसह ३० धावा केल्या. तर रिंकू सिंगने येताच अखेरच्या षटकात एक षटकार खेचला. यासह भारताने नेदरलँड्सला विजयासाठी १९४ धावांचं लक्ष्य दिलं आहे.

20:47 (IST) 18 Feb 2026
IND vs NED Live: शिवम दुबे अखेरच्या षटकात झेलबाद

शिवम दुबे अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. सीमारेषेजवळ व्हॅन डेर गुगटेनने शानदार झेल टिपला.

20:46 (IST) 18 Feb 2026

IND vs NED: हार्दिक-दुबेची फटकेबाजी

हार्दिक पंड्या व शिवम दुबेने भारताचा डाव सावरला आहे. १९व्या षटकात दोघांनी मिळून २१ धावा कुटल्या आणि संघाला १८० धावांपर्यंत पोहोचवलं आहे. आता अखेरच्या षटकात दोघं किती धावा कुटणार, यावर सर्वांच्या नजरा असतील.

20:31 (IST) 18 Feb 2026

IND vs NED Live: शिवम दुबेचं वादळी अर्धशतक

शिवम दुबेने वादळी फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला आहे. दुबेने मोक्याच्या क्षणी मोठे फटके खेळत अर्धशतकी खेळी केली आहे. शिवम दुबेने २५ चेंडूत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा केल्या. यासह भारताने १७ षटकांत ४ बाद १५३ धावा केल्या आहेत.

20:12 (IST) 18 Feb 2026

T20 WC 2026 IND vs NED live: सूर्यादादा तंबूत परतला

१४व्या षटकात क्लाईनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कर्णधार सूर्यकुमार यादव झेलबाद झाला. सूर्या २८ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह ३४ धावा करत बाद झाला.

20:11 (IST) 18 Feb 2026

IND vs NED live: भारताच्या १०० धावा पूर्ण

१३व्या षटकात नेदरलँड्सचा गोलंदाज एकरमॅनच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने २ षटकार एक चौकार खेचत संघाला १०० धावांचा पल्ला गाठून दिला. यासह १३ षटकांत भारताने ३ बाद १०८ धावा केल्या आहेत.

20:04 (IST) 18 Feb 2026

India vs Netherlands live: नेदरलँड्सची उत्कृष्ट गोलंदाजी

नेदरलँड्स संघाने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या धावांना ब्रेक लावला आहे. १२ षटकांत भारताने ३ विकेट्स गमावत फक्त ८९ धावा केल्या आहेत. १२व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सूर्याने षटकार लगावला, जी संघाची १९ चेंडूंनंतर पहिली बाऊंड्री होती.

19:51 (IST) 18 Feb 2026

IND vs NED Live: तिलक वर्मा झेलबाद

नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या धावांवर अंकुश ठेवला आहे. दबाव वाढत चालल्याने तिलक वर्मा नवव्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. नेदरलँड्सच्या ४१ वर्षीय खेळाडू व्हॅन डेर मर्वे याने हवेत डावीकडे डाईव्ह मारत शानदार झेल टिपला. यासह तिलक वर्मा २७ चेंडूत ३ चौकार एका षटकारासह ३१ धावा करत बाद झाला. यासह भारताने १० षटकांत ३ बाद ७५ धावा केल्या आहेत.

19:35 (IST) 18 Feb 2026

India vs Netherlands Live: पॉवरप्ले

पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाने २ बाद ५१ धावा केल्या आहेत. भारताचे दोन्ही सलामीवीर पॉवरप्लेमध्येच बाद होत माघारी परतले. सध्या तिलक वर्मा २६ धावा आणि कर्णधार सूर्या ७ धावा करत खेळत आहेत.

19:25 (IST) 18 Feb 2026
IND vs NED live Updates: इशान किशन बाद

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर तिलक वर्मा व इशान किशनने संघाचा डाव सावरला. पण पाचव्या षटकात इशान किशन विचित्र पद्धतीने झेलबाद झाला. आर्यन दत्तने टाकलेला चेंडू खेळायला इशान चुकला आणि चेंडू मांडीच्या पॅडला लागून उडाला आणि खाली टप्पा पाडून स्टंपवर जाऊन लागला, यासह अनलकी राहिलेला इशान किशन विचित्र पद्धतीने बाद झाला. इशान किशन ७ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह १८ धावा करत माघारी परतला.

https://twitter.com/EhDiya/status/2024120938493563007

19:05 (IST) 18 Feb 2026

T20 WC Live: भारताला पहिला धक्का

अभिषेक शर्मा सलग तिसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. पहिल्या दोन चेंडूवर तो धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. पण तिसऱ्या चेंडूवर चुकीच्या लेंग्थवर फटका मारण्यासाठी गेला आणि चेंडू जाऊन स्टंपवर आदळल्याने क्लीन बोल्ड झाला. आर्यन दत्तला पहिल्याच षटकात मोठी विकेट मिळाली.

18:43 (IST) 18 Feb 2026

IND vs NED Live: नेदरलँड्सची प्लेईंग इलेव्हन

मायकेल लेविट, मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), झॅक लायन-कॅशेट, नोहा क्रोस, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन

18:37 (IST) 18 Feb 2026
IND vs NED Live: भारताची प्लेईंग इलेव्हन

भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले आहेत. कुलदीप यादवच्या जागी अर्शदीप सिंग संघात परतला आहे. तर अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली असून वॉशिंग्टन सुंदर खेळताना दिसणार आहे.

इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

18:33 (IST) 18 Feb 2026
IND vs NED Toss: नाणेफेक

भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ सामन्याची नाणेफेक भारताने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह नेदरलँड्सचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल.

18:27 (IST) 18 Feb 2026

"अभिषेक तू सर्वात आधी एक...", सुनील गावस्करांनी शून्यावर बाद होणाऱ्या अभिषेक शर्माला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले...

Sunil Gavaskar Advice to Abhishek Sharma: टी-२० विश्वचषकात मोठी खेळी साकारण्यासाठी अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला सुनील गावस्करांनी मोलाचा सल्ला दिला आहे. ...सविस्तर बातमी
17:56 (IST) 18 Feb 2026

India vs Netherlands live: हेड टू हेड

भारत आणि नेदरलँड्स यांच्यात यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार सामने झाले आहेत. दोन्ही संघांमधील मागील प्रत्येक सामना टीम इंडियाने जिंकला आहे.

17:49 (IST) 18 Feb 2026

IND vs NED Live: भारत वि. नेदरलँड्स

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताने एकही सामना गमावलेला नाही. दरम्यान, नेदरलँड्सने फक्त एक सामना जिंकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि नेदरलँड्स एकमेकांसमोर येण्याची ही पाचवी वेळ असेल.

India vs Netherlands Highlights, ICC T20 World Cup 2026: भारताने नेदरलँड्सविरूद्ध सामन्यात शानदार कामगिरीसह विजय मिळवला. शिवम दुबे भारताच्या विजयाचा हिरो ठरला.