scorecardresearch

Premium

IND vs NED Warm Up: पावसाने टीम इंडियाच्या सरावावर फिरवले पाणी, इंग्लंडनंतर भारत-नेदरलँड्स यांच्यातील सामनाही रद्द

India vs Netherlands Warm Match: पावसाने भारतीय संघाच्या सरावावर पाणी फिरवले. इंग्लंडनंतर आता भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील दुसरा सामनाही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडिया आता थेट वर्ल्डकपची परीक्षा देणार आहे.

IND vs NED Warm Up: Second practice match between India and Netherlands cancelled toss did not even take place due to rain
पावसाने भारतीय संघाच्या सरावावर पाणी फिरवले. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

IND vs NED Score, ICC Cricket World Cup 2023 Warm Up Match Updates: भारतीय संघ आता सराव सामना न खेळता थेट विश्वचषकात प्रवेश करणार आहे. तिरुअनंतपुरममधील मंगळवारी (३ ऑक्टोबर) होणारा त्यांचा दुसरा सराव सामनाही रद्द करण्यात आला. पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. याआधी, ३० सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये इंग्लंडविरुद्धचा पहिला सराव सामनाही रद्द करण्यात आला होता. भारतीय संघ ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

पावसाने केला चाहत्यांचा हिरमोड

तिरुअनंतपुरममधील भारतीय संघाचा दुसरा सराव सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला. गुवाहाटीनंतर इथेही पावसाने चाहत्यांची मने तोडली आहेत. या दोन्ही शहरांतील चाहत्यांना वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला त्यांच्या देशात खेळताना पाहायचे होते, पण तसे झाले नाही. गुवाहाटीमध्ये नाणेफेक शक्य झाली होती, पण तिरुअनंतपुरममध्ये ते ही होऊ शकले नाही. भारतीय संघ ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची स्वप्न बघत असून चाहत्यांनी त्यासाठी देवाकडे साकडे घातले आहे. भारताने याआधी १९८३ आणि २०११ मध्ये विश्वचषक जिंकण्यात यश मिळवले होते.

australia srilanka final in dark light
World Cup Cricket: काळ्याकुट्ट अंधारात खेळवण्यात आलेली वर्ल्डकप फायनल
south africa in world cup rain equation
Cricket World Cup: पाऊस जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हिरावतो
IND vs SL, Asia Cup: after Mohammad Siraj terrific performance Fans cried profusely after seeing the state of Sri Lanka see photos
IND vs SL, Asia Cup: सिराज फॉर्मात, चाहते कोमात! श्रीलंकेच्या पराभवानंतर फॅन्सना अश्रू अनावर, पाहा Video
IND vs BAN: In Asia Cup Shubman Gill brilliant 5th ODI century against Bangladesh crosses 1000 runs in 2023
IND vs BAN, Asia Cup: एक अकेला सब पे भारी! शुबमन गिलचे झुंजार शतक, वन डेमध्ये केल्या हजार धावा पूर्ण

विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे स्पर्धा आहेत. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. १० पैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिश संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला.

कोहली मुंबईत परतला होता

पहिला सराव सामना रद्द झाल्यानंतर विराट कोहली गुवाहाटीहून थेट मुंबईत परतला. तो संघासह तिरुअनंतपुरमला गेला नाही. कौटुंबिक कारणामुळे कोहलीने संघ व्यवस्थापनाकडे रजा मागितली होती. कोहली दुसऱ्या सराव सामन्यात खेळणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. मोहम्मद सिराज.

नेदरलँड्स: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडाड, वेस्ली बरेसी, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर/कर्णधार), लोगान व्हॅन बीक, शारीझ अहमद, आर्यन दत्त, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकर , रायन क्लेन, साकिब झुल्फिकार.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs ned warm up rain disrupts team india practice india netherlands match canceled after england avw

First published on: 03-10-2023 at 17:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×