IND vs NZ 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना ऑकलँडच्या मैदानावर पार पडल. भारतीय संघाने याआधी झालेल्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडवर ३-२ ने दमदार विजय मिळवत मालिका खिशात घातली होती. आता वनडे मालिकेतही भारतीय संघाने विजयाने सुरूवात केली आहे. हा सामना भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला असून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

कर्णधार शुबमन गिल परतला तंबूत

भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे. शुबमन गिल ३७ धावा करून माघारी परतला आहे.

पाऊस थांबला, सामन्याला सुरूवात; पण टार्गेट बदललं! विजायासाठी किती धावांची गरज?

भारतीय संघाला विजयासाठी ४० षटकांत १६७ धावा करायच्या आहेत.

पावसामुळे खेळ थांबला! टीम इंडिया मजबूत स्थितीत

पावसामुळे खेळ थांबला आहे. भारतीय संघाने १० षटकांत १ गडी बाद ५४ धावा केल्या आहेत.

रोहित- गिलची जोडी जमली! टीम इंडियाचं दमदार पुनरागमन

भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसल्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिलने भारताचा डाव सावरला आहे.

पहिल्याच षटकात टीम इंडियाला मोठा धक्का! रोहित शर्मा शून्यावर परतला माघारी

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला आहे.

न्यूझीलंडचा डाव अवघ्या इतक्या धावांवर आटोपला! टीम इंडियाला विजयासाठी किती धावांची गरज?

पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडचा डाव अवघ्या १८५ धावांवर आटोपला आहे. भारतीय संघाला विजयासाठी १८६ धावांची गरज आहे.

अर्शदीप सिंगचा विकेट्सचा चौकार! ग्लेन फिलिप्स परतला माघारी

अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्स २३ धावा करून माघारी परतला आहे.

अर्शदीपच्या गोलंदाजीवर विराटने घेतला सोप झेल! जेमिसन परतला तंबूत

अर्शदीप सिंगने वैयक्तिक तिसरा विकेट घेत न्यूझीलंडला आठवा धक्का दिला आहे. न्यूझीलंडने ८ गडी बाद १३१ धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने एका हाताने घेतला अविश्वसनीय कॅच; न्यूझीलंडचे ७ फलंदाज तंबूत

विराट कोहलीने एका हाताने भन्नाट कॅच घेतला आहे. त्यामुळे स्मिथ स्वस्तात माघारी परतला आहे.

काय बॉल टाकलाय भावा! अंशुल कंबोजच्या वेगवान चेंडूवर मिचेल सँटनरची दांडी गुल

अंशूल कंबोजने टाकलेल्या भन्नाट वेगवान चेंडूवर मिचेल सँटनर ४ धावा करून माघारी परतला आहे.

न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत! रोहित शर्माचा भन्नाट थ्रो, डॅरिल मिचेल परतला माघारी

रोहित शर्माच्या भन्नाट थ्रो मुळे डॅरिल मिचेलला २८ धावांवर माघारी परतावं लागलं आहे.

गुरनूर ब्रारने आपल्याच गोलंदाजीवर घेतला भन्नाट कॅच! टॉम लॅथम परतला माघारी

डावातील १७ व्या षटकात गुरनूरने लॅथमला ३ धावांवर माघारी धाडलं आहे. (न्यूझीलंड – ४ गडी बाद ८४ धावा)

गुरनूर ब्रारच्या गोलंदाजीवर सेफर्ट परतला माघारी

डावातील १५ व्या षटकात गुरनूरने सेफर्टला ३८ धावांवर माघारी धाडलं आहे. (न्यूझीलंड – ३ गडी बाद ७९ धावा)

अर्शदीप सिंगने न्यूझीलंडला दिला दुसरा धक्का! हेन्री निकोल्स स्वस्तात परतला माघारी

डावातील ९ व्या षटकात अर्शदीप सिंगने निकोल्सला ९ धावा करून माघारी धाडलं आहे. (न्यूझीलंड – २ गडी बाद ४० धावा)

न्यूझीलंडला पहिला मोठा धक्का

न्यूझीलंडला सुरूवातीलाच अर्शदीप सिंगने मोठा धक्का दिला आहे. विल यंग ९ धावा करून माघारी परतला आहे.

प्लेईंग ११

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन):
टिम सेफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर

भारत (प्लेइंग इलेव्हन):

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टिरक्षक), नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग</p>

नाणेफेक

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.