IND vs NZ ODI Series Timing and Live Streaming: न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. यादरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यासह रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी नवीन वर्षात पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. या मालिकेतील सामने ११ जानेवारीपासून सुरु होत आहेत. हे सामने किती वाजता सुरु होणार आहेत, जाणून घेऊया.
वडोदराच्या कोटांबी स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना खेळवला जाणार आहे. कोटंबी स्टेडियममध्ये गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जात आहेत. वडोदरामध्ये रोहित-विराटला पाहण्यासाठी चाहत्यांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. चाहते या दोन्ही दिग्गज खेळाडूंचा सराव पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी करताना दिसत आहेत. रोहित – विराट आपल्या कमालीच्या फॉर्मसह मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला वडोदरामध्ये तर दुसरा वनडे सामना बुधवारी १४ जानेवारीला सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. तर तिसरा सामना १८ जानेवारीला होळकर स्टेडियम इंदोरमध्ये खेळवला जाणार आहे. या वनडे मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. ही टी-२० मालिका २१ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही वनडे मालिका दोन्ही संघांच्या सरावासाठी महत्त्वाची असणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड सामने लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि न्यूझीलंड वनडे मालिकेतील सामने दुपारी १.३० वाजता सुरु होतील. तर नाणेफेक अर्धा तास आधी १ वाजता होईल. मालिकेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स १ या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहेत. तर जिओ हॉटस्टार अॅपवर सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, नितीश कुमार रेड्डी, ऋषभ पंत, के एल राहुल, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, प्रसिध कृष्णा.
न्यूझीलंडचा वनडे संघ
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदित्य अशोक, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉन्वे, जॅक फॉक्स, मिचेल हे, निक केले, डॅरिल मिचेल, हेन्री निकोलस, जेडेन लेनोक्स, ग्लेन फिलिप्स, मायकल रे, विल यंग, काईल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क
