IND vs NZ: Wow what a catch Sundar caught amazing catch while flying in the air see VIDEO | Loksatta

IND vs NZ 1st T20: व्वा काय जबरदस्त झेल! वॉशिंग्टन सुंदरचा सूर मारत अप्रतिम झेल; ब्लॅक कॅप्स झाला आश्चर्यचकित, Video व्हायरल

भारत- न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० मालिकांच्या पहिल्या सामन्यात फिरकपटू वॉशिंग्टन सुंदरने स्वतःच्याच गोलंदाजीवर शानदार झेल घेत किवी फलंदाजाला अचंबित केले.

IND vs NZ: Wow what a catch Sundar caught amazing catch while flying in the air see VIDEO
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

India vs New Zealand 1st T20 Match Updates: रांची येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील पहिला टी२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी मार्क चॅपमनचा अप्रतिम झेल टिपला.

टीम इंडियाचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने अनेक प्रसंगी स्वत:ला चांगले सिद्ध केले आहे. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रांची येथे खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठीही सुंदरला संधी देण्यात आली आहे. त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुंदरने या सामन्याच्या सुरुवातीला धोकादायक गोलंदाजी करत पॉवर प्लेमध्ये एक खास विक्रम केला आहे. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत सुंदरने अक्षर पटेलला मागे टाकले आहे.

वॉशिंग्टन सुंदरने अप्रतिम झेल घेतला

वास्तविक वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी पाचवे षटक आणले होते. या षटकात सुंदरने प्रथम फिन अॅलनला पायचीत केले. त्यानंतर त्याच षटकात मार्क चॅपमनला अप्रतिम झेल देऊन चालायला लावले. फलंदाजाने चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटला लागून हवेत गेला. चेंडू त्याच्या बाजूने जात असल्याचे पाहून सुंदरने त्यावर जोरदार झेल घेतला आणि हवेत उडत एका हाताने अशक्यप्राय झेल घेतला. वॉशिंग्टन सुंदरने मार्क चॅपमनला शून्यावर बाद केले.

पॉवरप्लेमधील अक्षर पटेलचा विक्रम मोडला

सुंदरने पॉवरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी करत एक खास विक्रम केला. भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात त्यांनी अक्षर पटेलला मागे टाकले आहे. रविचंद्रन अश्विन या बाबतीत आघाडीवर आहेत. त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत. सुंदरने १५ विकेट्स घेतल्या आहेत. तर अक्षरने १३ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा: IND vs NZ 1st T20: त्रिशतकवीर पृथ्वी शॉ संघाबाहेरच! नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याचा आश्चर्यचकित करणारा निर्णय

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय फिरकी गोलंदाज

१७ – रविचंद्रन अश्विन

१५ – वॉशिंग्टन सुंदर*

१३ – अक्षर पटेल

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 20:25 IST
Next Story
IND vs NZ 1st T20: त्रिशतकवीर पृथ्वी शॉ संघाबाहेरच! नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याचा आश्चर्यचकित करणारा निर्णय