भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना खेळण्यासाठी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर उतरताच भारताने एक नवा किर्तीमान निर्माण केला. कारण भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे, ज्याने वेगवेगळ्या ५० क्रिकेट स्टेडियमवर वनडे सामने आयोजित करण्याचा पराक्रम केला आहे.

जगातील सर्व देशांतील क्रिकेट मंडळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा हेवा का करतात? याचे कारण बीसीसीआय प्रत्येक गोष्टीत सक्षम आहे. भारतात आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. याशिवाय भारताकडे जगातील सर्वात मोठी टी-२० लीग आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाच वेळी एकापेक्षा जास्त संघ खेळू शकतात अशी क्षमता बीसीसीआयकडे आहे.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
newzealand visa rules changed
भारतीयांना फटका! न्यूझीलंडकडून व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल, काय आहेत नवे नियम?

वास्तविक, भारत हा जगातील पहिला देश आहे, जिथे ५० मैदानांवर एकदिवसीय सामने आयोजित केले गेले आहेत. यातील बहुतांश मैदानांवर भारतीय संघ खेळला आहे. शनिवार, २१ जानेवारी, २०२३ रोजी, जेव्हा भारत आणि न्यूझीलंड संघ रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर खेळायला आले, तेव्हा तो भारतासाठी अभिमानाचा क्षण होता. कारण हे भारतात बांधलेले ५० वे स्टेडियम होते, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात होता. या बाबतीत भारत हा जगातील एकमेव देश आहे, ज्याने ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कापले नाक; इतक्या स्वस्तात ५ विकेट गमावल्या की बनला लाजिरवाणा विक्रम

जगात असे अनेक देश आहेत जिथे क्रिकेट स्टेडियमची कमतरता दिसून येते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड असे देश आहेत, जिथे क्रिकेट मैदानाची कमतरता आहे. ज्यामुळे ते एकच मैदान फुटबॉल आणि रग्बीसारख्या खेळांसाठी वापरतात.

परंतु भारतात असे काहीही नाही. स्टेडियम फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी बनवले जातात. आता हा आकडा ५० पर्यंत पोहोचला आहे. जो स्वतःच एखाद्या विक्रमापेक्षा कमी नाही. रायपूरच्या या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ६० हजारांहून अधिक आहे. हे भारतातील तिसरे मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.

हेही वाचा – IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कापले नाक; इतक्या स्वस्तात ५ विकेट गमावल्या की बनला लाजिरवाणा विक्रम

सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३४.३ षटकांत सर्वबाद १०८ धावा केल्या. भारतीय संघाने याला प्रत्युत्तर देताना २०.१ षटकांनंतर २ बाद ११० धावा केल्या. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली.