India vs New Zealand 2nd ODI Live Updates in Marathi: न्यूझीलंड संघाने भारतावर ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. यासह वनडे मालिका १-१ बरोबरीत आली आहे. आता मालिकेतील तिसरा सामना निर्णायक असणार आहे. डॅरिल मिचेलने ११७ चेंडूत ११ चौकार व २ षटकारांसह १३१ धावांची नाबाद खेळी केली. तर विल यंगने ९८ चेंडूत ७ चौकारांसह ८७ धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्सने २५ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह ३२ धावा केल्या. यासह संघाने ४७.३ षटकांत ३ बाद २८६ धावा करत विजय मिळवला.

विल यंग झेलबाद

कुलदीप यादवच्या षटकांमध्ये डॅरिल मिचेल दोन वेळा बाद होण्यापासून वाचला, पण मिचेल नाहीतर कुलदीपने विल यंगला बाद करत ही १६२ धावांची भागीदारी तोडली. यासह आता न्यूझीलंडला विजयासाठी ७२ चेंडूत ७७ धावांची गरज आहे.

डॅरिल मिचेल-विल यंगची अर्धशतकं

डॅरिल मिचेल व विल यंग या दोघांनीही अर्धशतकं केली आहेत. तर भागीदारी १०० धावांच्या पलीकडे गेली आहे. दोघांनीही मिळून ३२ षटकांत २ बाद १६६ धावा केल्या आहेत. १२ षटकांत न्यूझीलंडला विजयासाठी ११९ धावांची गरज आहे.

भारताच्या खात्यात दुसरी विकेट

प्रसिध कृष्णाने १३व्या षटकात हेन्री निकोल्सला क्लीन बोल्ड करत भारताला दुसरी विकेट मिळवून दिली.

डेव्हॉन कॉन्वे क्लीन बोल्ड

हर्षित राणाने सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉन्वेला क्लीन बोल्ड करत संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. षटकातील पहिल्या चेंडूवर त्याचा झेल सुटला होता. पण दुसऱ्या चेंडूवर कॉन्वेला बोल्ड करत माघारी धाडलं. यासह न्यूझीलंडने १ बाद २२ धावा केल्या आहेत.

केएल राहुलचं शतक आणि धावांचा डोंगर

केएल राहुलने उत्कृष्ट शतकी खेळी साकारत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं आहे. राहुलने ९२ चेंडूत १ षटकार व ११ चौकारांसह नाबाद ११२ धावांची शतकी खेळी साकारली. राहुलच्या या खेळीसह भारतीय संघाने ७ बाद २८४ धावा केल्या. यासह न्यूझीलंड संघाला विजयासाठी भारताने २८५ धावांचं लक्ष्य दिलं.

नितीश रेड्डी, हर्षित झेलबाद

केएल राहुल व नितीश रेड्डी यांनी ५७ धावांची शानदार भागीदारी रचत संघाची धावसंख्या २५० च्या जवळ नेऊन ठेवली आहे. पण ४७व्या षटकीत झॅक फॉल्क्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात २१ धावांवर झेलबाद होत माघारी परतला. तर जेडन लेनक्सने हर्षित राणाला झेलबाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट मिळवली आणि यासह भारताने ७ विकेट्स गमावल्या आहेत.

केएल राहुलचं अर्धशतक

केएल राहुलने ५३ चेंडूत ६ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली. यासह भारताने ४० षटकांत १९९ धावा केल्या आहेत.

रवींद्र जडेजा झेलबाद

केएल राहुलच्या जोडीने रविंद्र जडेजाने संघाचा डाव सावरला. पण मायकेल ब्रेसवेलच्या षटकात सरळ फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. जडेजा २७ धावा करत माघारी परतला.

राहुल-जडेजाची भागीदारी

केएल राहुल रविंद्र जडेजा या जोडीने भारताचा डाव सावरत सावध फलंदाजी केली आणि संघाचा डाव सावरला. भारताच्या धावांची गती कमी असली तरी विकेट मात्र गमावलेली नाही. ३५ षटकांत भारताने ३ विकेट्स गमावत १६५ धावा केल्या आहेत. यासह दोघांनी अर्धशतकी भागीदारी साकारली आहे.

विराट कोहली बाद

क्रिस्टियन क्लार्कने २४व्या षटकात विराट कोहलीला क्लीन बोल्ड करत भारताला मोठा धक्का दिला आहे. विराट कोहलीच्या बॅटची कड घेत चेंडू स्टंपवर आदळला आणि विराट कोहली क्लीन बोल्ड झाला. विराट २३ धावा करत बाद झाला. यासह भारताने २४ षटकांत ४ बाद १२० धावा केल्या आहेत.

श्रेयस अय्यरच्या रूपात संघाला तिसरा धक्का

रोहित शर्माला बाद करणाऱ्या क्रिस्टियन क्लार्कने श्रेयस अय़्यरलादेखील माघारी धाडलं आहे. श्रेयस अय्यर ८ धावा करत स्वस्तात बाद झाला. यासह टीम इंडियाला तिसरा धक्का बसला आहे आणि दोन विकेट्समुळे संघाच्या धावांवर ब्रेक लागला आहे.

भारताला दुसरा धक्का

काईल जेमिसनने १७व्या षटकातील पाचव्या चेंडूवर गिलला झेलबाद केलं. अंगावर आदळणाऱ्या चेंडूवर गिल फटका खेळायला गेला आणि शॉर्ट मिडविकेटवर झेलबाद झाला. यासह गिल ५३ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ५६ धावा केल्या. यासह भारताने २ बाद ९९ धावा केल्या आहेत.

कर्णधार शुबमन गिलचं अर्धशतक

कर्णधार शुबमन गिलला सूर गवसला असून त्याने दुसऱ्या वनडे सामन्यातही अर्धशतक झळकावलं आहे. गिलने ४७ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ५१ धावा करत त्याने अर्धशतक झळकावलं आहे.

रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला धक्का

रोहितने गिलच्या मदतीने चांगली सुरूवात करून दिली. पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात दुसऱ्या सामन्यातही अपयशी ठरला. क्रिस्टियन क्लार्कच्या १३व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा मोठा फटका खेळायला गेला, पण बॅटचा चेंडूशी नीट संपर्क न झाल्याने हवेत चेंडू उडाला आणि तो झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी रोहितने ३८ चेंडूत ४ चौकारांसह २४ धावा केल्या.

रोहित-गिलला सूर गवसला

सुरूवातीच्या षटकांमध्ये सावध फलंदाजी केल्यानंतर पुढच्या षटकांमध्ये रोहित-गिलने आक्रमक फटके खेळायला सुरूवात केली. यासह नवव्या षटकात भारताने ५० धावांचा पल्ला गाठला आहे.

काईल जेमिसनची भेदक गोलंदाजी

काईल जेमिसनची भारताविरूद्ध दुसऱ्या सामन्यात भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्याने २ षटकांमध्ये फक्त २ धावा दिल्या आहेत. रोहित शर्मा व शुबमन गिलने ५ षटकांत १० धावा केल्या आहेत.

भारताच्या डावाला सुरूवात

दुसऱ्या वनडे सामन्याला सुरूवात झाली असून भारताकडून रोहित शर्मा व शुबमन गिल जोडी फलंदाजीला उतरली आहे. राजकोटच्या मैदानावर हिटमॅनचा उत्तम रेकॉर्ड आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा

न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन

डेव्हॉन कॉन्वे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकिपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक फॉल्क्स, जेडेन लेनक्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन

नाणेफेक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक न्यूझीलंड संघाने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ फलंदाजीने दुसऱ्या सामन्याला सुरूवात करेल. गेल्या ४ सामन्यांमध्ये राजकोटमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे. राजकोटची खेळपट्टी फलंदाजीसाठी ओळखली जाते. त्यामुळे नाणेफेक गमावल्यानंतरही भारतासाठी ही चांगली गोष्ट ठरली आहे. न्यूझीलंड संघाकडून फिरकीपटू जेडन लेनक्सला पदार्पणाची संधी मिळाली आहे. जेडन लेनक्सला मिचेल सँटनरसारख्या गोलंदाजीसाठी ओळखलं जातं.

पहिल्या वनडेत काय घडलं?

भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील पहिला वनडे सामना वडोदरा येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ३०० धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने ३०१ धावांचे लक्ष्य एक षटक आधी म्हणजेच ४९ व्या षटकात ६ विकेट्स गमावून पूर्ण केले. विराट कोहली ९३ धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा स्टार ठरला.

टीम इंडियाला दुखापतींचा धक्का

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला अजूुन धक्का बसला. पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या सुरुवातीपूर्वी ऋषभ पंत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आणि त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संघात स्थान देण्यात आलं. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरलाही दुखापत झाली. सुंदरलाही दुखापतीमुळे मालिकेबाहेर व्हावं लागलं आणि त्याच्या जागी आयुष बदोनीचा समावेश करण्यात आला आहे.