भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो अशा प्रकारचा आहे. हा सामना गमावल्यास भारतीय संघ मालिकाही गमावेल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तब्बल तीन तास पावसाने खोडा घातल्यामुळे सामना थांबविण्यात आला होता. अखेर भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.१० मिनिटांनी सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. पावसामुळे आजच्या एकदिवसीय सामन्यात नियमात बरेच बदल करण्यात आले आहेत. पंचानी सांगितलेल्या माहितीनुसार २९-२९ षटकांचा सामना होणार आहे. इनिंग ब्रेक हा १० मिनिटांचा असणार आहे तर ड्रिंक्स ब्रेक घेण्यात येणार नाही. सध्या भारताने कर्णधार शिखर धवनच्या रूपाने एक विकेट गमावली आहे. सध्या सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल उत्तम फटकेबाजी करत असून भारताची धावसंख्या ही १० षटकात ६० वर एक गडी बाद अशी झाली आहे.

सामना सुरु होण्याआधी भारताचा ‘द- स्काय’अशी ओळख असणारा फलंदाज सूर्यकुमार यादवने ग्राऊंड स्टाफसोबत गाडीतून खेळपट्टीवर फेरफटकाही मारला. न्यूझीलंडच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरला. सूर्यकुमार यादव व ऋषभ पंत यांच्याकडून आज संघाला अपेक्षा असतील. पहिल्या सामन्यात दोघांना अपयश आले होते. पण, संजू सॅमसनने पाचव्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह चांगली भागीदारी करूनही त्याला पुन्हा बाकावर बसवले गेले. अष्टपैलू दीपक हुडा आणि दीपक चहर यांना संधी मिळाली आहे. शार्दूल ठाकूर याला आज वगळले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 2nd odi match restart the video of suryakumars tour to take stock of the situation went viral avw
First published on: 27-11-2022 at 11:43 IST