scorecardresearch

‘सलामीवीर म्हणून शुबमनला विश्वचषकासाठी ‘हा’ खेळाडू देऊ शकतो आव्हान’,संजय बागर यांचे वक्तव्य

Sanjay Bangar on Shubman Gill: भारताचे माजी खेळाडू संजय बागर यांनी वनडे विश्वचषक २०२३ साठी गिलला सलामीवीर म्हणून कोण आव्हान देऊ शकतो, याचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर तो फलंदाज डावखुरा असल्याचे सांगितले आहे.

‘सलामीवीर म्हणून शुबमनला विश्वचषकासाठी ‘हा’ खेळाडू देऊ शकतो आव्हान’,संजय बागर यांचे वक्तव्य
शुबमन गिल (फोटो-बीसीसीआय ट्विटर)

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड संघात तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिलने मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवताना नाबाद ४० धावांची खेळी केली. दरम्यान शुबमन गिलबाबत संजय बांगर यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो भारतात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघ तयारी करत आहे. त्यासाठी भारतीय संघानेही तयारी सुरू केली आहे. प्रत्येक स्थानासाठी दोन खेळाडू दिसत आहेत. यावेळी ओपनिंगबाबत चर्चा आहे की, रोहित शर्मासोबत शुबमन गिल हा दुसरा सलामीवीर असेल की अन्य कोणी फलंदाज? माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.

भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान सांगितले की, इशान किशन हे एक नाव आहे. जो एकदिवसीय विश्वचषकात शुबमन गिलची जागा घेऊ शकतो. कारण तो डावखुरा फलंदाज आहे. त्याची जागाही बनू शकते. कारण तो यष्टीरक्षक आहे ऋषभ पंत विश्वचषकासाठी तंदुरुस्त होऊ शकत नाही.

स्टार स्पोर्ट्सवर संजय बांगर म्हणाले, “मला अद्याप खात्री नाही, कारण वरवर पाहता एक फलंदाज (इशान किशन) आहे, जो डावखुरा फलंदाज आहे, ज्याने अलीकडेच वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक केले आहे.” वयाच्या बाबतीत दोघांमध्य खूप समानता आहे. तो २४ वर्षांचा आहे आणि शुबमन २३ वर्षांचा आहे.”

हेही वाचा – IND vs NZ 2nd ODI: अशक्य ते शक्य करून दाखवते ती टीम इंडिया; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच देश

बांगर पुढे म्हणाले, “भारतीय क्रिकेटसाठी एक मोठी गोष्ट आहे. कारण ते खरोखरच तुमचे पर्याय कमी करते, कदाचित आता या तिघांपैकी दोन वनडे विश्वचषकात भारतीय संघासाठी नक्कीच सलामी देतील.” यापूर्वी शिखर धवन रोहित शर्मासोबत ओपनिंग करायचा, पण आता तो संघातून बाहेर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 19:38 IST

संबंधित बातम्या