Sanju Samson's video helping the ground staff is going viral | Loksatta

IND vs NZ 2nd ODI: सामना न खेळताच संजू सॅमसनने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडिओ

संजू सॅमसनला आजच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती. त्यानंतर संजू सॅमसनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

IND vs NZ 2nd ODI: सामना न खेळताच संजू सॅमसनने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडिओ
संजू सॅमसनचा मन जिंकणार एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र-लोकसत्ता)

भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तत्पुर्वी या सामन्यासाठी निवडलेल्या भारतीय संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आले होते. त्यावरुन चाहत्यानी संघ व्यवस्थापन आणि कर्णधारावर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. त्यानंतर आता संजू सॅमसनचा मन जिंकणार एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात संजू प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. परंतु त्याने असे काहीतरी केले आहे, ज्यामुळे चाहते त्याच्यासाठी वेडे झाले आहेत. खरंतर, पावसामुळे मैदानावरील कर्मचारी सामना व्यवस्थित पार पडला जावा, म्हणून शक्य तितके मैदानावर सतत काम करत होते. त्याच दरम्यान, संजू सॅमसन देखील त्यांच्या मदतीसाठी ग्राउंड स्टाफमध्ये सामील झाला होता.

संजूच्या या कृतीमुळे तो सोशल मीडियावर हिरो बनला आहे. त्याच वेळी, संजू सॅमसनचा हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने (आरआर) देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्पोर्ट्स स्टाफप्रमाणे कव्हर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. या सामन्यात सॅमसनच्या जागी दीपक हुडाचा सहावा गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता.

याआधी आशिया चषक आणि नंतर टी-२० विश्वचषकातही निवडकर्त्यांनी संजू सॅमसनवर विश्वास ठेवला नाही. त्याचवेळी सॅमसनविरुद्ध घाणेरडे राजकारण खेळले जात असल्याने त्याला संघात स्थान दिले जात नसल्याचे चाहत्यांचे मत आहे. २०१५ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सॅमसनकडे नेहमीच कानाडोळा करण्यात आला आहे. सॅमसनने २०१२ पासून फक्त १६ सामने खेळले आहेत, तर पंतने त्याच्यानंतर २०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून ६५ हून अधिक सामने खेळले आहेत.

संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर अनेक दिग्गज आणि चाहते नाखूष आहेत. कारण संजूला टी-२० किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या पात्रतेनुसार संधी दिली जात नाही. अशा परिस्थितीत संजूवर हा अन्याय सुरूच राहणार की त्याला दीर्घकाळ संधी दिली जाईल, हे येणारा काळच सांगेल.

हेही वाचा – बादशाहच्या गाण्यावर धोनी आणि पांड्याने ब्रदर्सने धरला ठेका, व्हिडिओ होतोय व्हायरल

सामन्याबद्दल बोलायचे तर, पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हॅमिल्टनच्या मैदानावर आज सकाळपासून पाऊस पडत होता. सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस थांबला असला तरी ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर झाला होता. ४.५ षटकांचा खेळ संपल्यानंतर पाऊस परतला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा दोन्ही डावांतून २१ षटके कापण्यात आली होती. त्यानंतर १२.५ षटकांचा खेळ संपल्यानंतर पाऊस परतला आणि सामना रद्द करण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 13:39 IST
Next Story
IND vs NZ 2nd ODI: संततधार पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना अखेर रद्द, टीम इंडियाच्या मालिका विजयाच्या स्वप्नावर पाणी