India vs New Zealand 3rd ODI Match Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया मालिकेत २-० ने पुढे आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याकडे त्याची नजर आहे. यापूर्वीच्या मालिकेत भारताने श्रीलंकेचा ३-० असा पराभव केला होता.

टीम इंडिया २०१७ नंतर होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. या मैदानावर टीम इंडियाला एकदिवसीय अद्याप पराभव पत्करावा लागला नाही. अशा परिस्थितीत हाच क्रम कायम ठेवत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष असेल. न्यूझीलंडने संघात एक बदल केला असून वेगवान गोलंदाज शिपलीला वगळले आहे. त्याच्या जागी जेकब डफीला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, भारताने देखील दोन बदल केले असून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. दोघांच्या जागी उमरान मलिक आणि युजवेंद्र चहलला अंतिम अकरा मध्ये स्थान देण्यात आले आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित
IPL 2024 Sameer Rizvi Removed His Cap While Handshaking Virat Kohli
IPL 2024 : सीएसकेच्या समीर रिझवीने जिंकली सर्वांची मनं, विराट कोहलीबरोबरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल

नाणेफेकीदरम्यान रोहित म्हणाला, “नाणेफेक जिंकल्यानंतरही आम्ही प्रथम फलंदाजी केली असती, एक संघ म्हणून आम्हाला कोशातून बाहेर पडून चांगले खेळायचे आहे. फलंदाजीसाठी हे एक उत्तम मैदान आहे, प्रत्येक वेळी आम्ही येथे आलो तेव्हा चांगली धावसंख्या झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे जे आतापर्यंत खेळले नाही त्या काही नवीन खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे.”

याआधी पिच रिपोर्ट दरम्यान अजित आगरकर म्हणाला होता की, “भारतीय वेगवान गोलंदाजांसाठी थोडा आनंद पाहायचा होता मात्र मला वाटत नाही की येथे तसे होईल. खेळपट्टीच्या मध्यभागी गवताचे आच्छादन आहे आणि ते एकत्र ठेवण्यासाठी जसजशी संध्याकाळ होत जाईल तसतसा चेंडू पुढे सरकत जाईल. बेअर पॅच फलंदाजांच्या अगदी जवळ जातात पण मला वाटत नाही की गोलंदाजासाठी खेळपट्टी चांगली आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली दिसते. दुपारची सुरुवात डावाच्या सुरुवातीला गोलंदाजीला थोडी साथ देईल, पण दिवस पुढे जाताना आजचा दिवस हा फलंदाजीचा असेल.”

हेही वाचा: Mohammed Shami: मोहम्मद शमीला कोर्टाचा झटका! पत्नी हसीन जहाँला दरमहा द्यावी लागणार भलीमोठी पोटगी

रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये गाठला मोठा टप्पा

रोहित शर्मा २३ जानेवारी २०१३ पर्यंत वन डे कारकिर्दीत अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. पण जेव्हा त्याला पहिल्यांदा संघासाठी डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून गोष्टी पूर्णपणे बदलल्या. जिम्बाब्वेविरुद्धच्या एका मालिकेत त्याने त्याने अपेक्षित प्रदर्शन केले नाही, म्हणून २०११ एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. पण त्यानंतर १८ महिन्यांनी त्यावेळी संघाचा कर्णधार असलेल्या एमएस धोनी याने रोहित शर्माला सलामीवीराच्या रूपात खेळण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर रोहितच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने गती मिळाली.