scorecardresearch

IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय, संजू सॅमसनला पुन्हा वगळले

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला मालिकेत बरोबरी करण्याची ही शेवटची संधी आहे. न्यूझीलंड १-० ने पुढे आहे.

IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय, संजू सॅमसनला पुन्हा वगळले
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना बुधवारी म्हणजेच आज ख्राईस्टचर्च खेळवला जाणार असून यामध्ये पावसाचा व्यत्यय येणार नाही अशी दोन्ही संघांना आशा आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात न्यूझीलंडशी दोन हात करत आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाऊस पडून त्याने भारताच्या मालिका विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या.

पहिल्या सामन्यात विजय मिळवून किवींनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या स्थानी घसरली. आज भारतीय संघासमोर मालिका वाचवण्याच्या आव्हानासोबतच क्रमावारीत सुधारणा करण्याचे लक्ष्य असणार आहे. आजच्या सामन्यात तरी संजू सॅमसनला  संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षाच राहिली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन नाणेफेकीच्या बाबतीत पुन्हा नशीबवान ठरला, त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

सलामीवीर कर्णधार शिखर धवन आणि युवा फलंदाज शुबमन गिल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली आहे. पहिल्या १० षटकात भारताने ४३/१ धावा झाल्या आहेत. पावसाळी वातावरण असल्याने चेंडू स्विंग होत आहे. टिम साऊदीने चांगली गोलंदाजी केली आहे. धवन हा ३५ चेंडूत २५ धावा केल्या. शुबमन गिलने २२ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. भारताचा इनफॉर्म फलंदाज श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला आहे.

संजू सॅमसनला टी२० मालिकेत संधी न दिल्यानंतर शिखर धवनने त्याला पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघात स्थान दिले होते. ऋषभ पंत सूर्यकुमार यादव त्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर संजूने श्रेयस अय्यरसोबत टीम इंडियाचा डाव सावरला आणि तीनशेपार संघाची धावसंख्या पोहचवली होती. पण, भारताला सामना गमवावा लागला. अतिरिक्त गोलंदाज खेळवण्यासाठी संजूला दुसऱ्या एकदिवसीय मधून वगळण्यात आले आणि त्याच्या जागेवर दीपक हुडाला संधी दिली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने संघात कोणताच बदल केलेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 07:58 IST

संबंधित बातम्या