IND vs NZ 3rd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सध्या सुरु आहे. न्यूझीलंड दौर्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये संजू सॅमसनला जागा न देण्यावरून आता अनेक स्तरातून टीका होत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही संजूची बाजू घेत त्याने इंडियाला ऐकवले होते. बीसीसीआय आणि संघ निवडकर्त्यांवर “अंतर्गत राजकारण” करत असल्याचा आरोप करत आता पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियानेही आपली भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सॅमसनला T20I मालिकेत वगळण्यात आले होते. तर एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी त्याला संघात घेण्यात आले मात्र पुन्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी वगळण्यात आले होते. या आरोपांवर टी २० संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने उत्तर देत सॅमसनला न खेळवणं हे संघाच्या धोरणानुसार ठरलं मात्र ही नक्कीच एक दुर्दैवी बाब आहे, असे म्हंटले होते.

टी २० नंतर, सॅमसनला गेल्या शुक्रवारी ऑकलंडमधील एकदिवसीय सामन्यात अखेरीस प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले. सॅमसनने या सामन्यात ३८ चेंडूत ३६ धावा करून श्रेयस अय्यरसोबत ९६ धावांची भागीदारी केली. तरीही, दीपक हुडाला संघात घेण्यासाठी सॅमसनला दुसऱ्या सामन्यात वगळण्यात आले. यावेळेस भारताला सहाव्या गोलंदाजीच्या पर्यायाची गरज भासत असल्याने असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले होते. या एकूण प्रकरणात पाकिस्तानी क्रिकेटर कनेरियाने बीसीसीआयला फटकारले आहे.

“संजू सॅमसनवर तुमचा काही वैयक्तिक राग आहे का? असे विचारातच कनोरिया पुढे म्हणाला की, “अंबाती रायडूची कारकीर्द अशीच संपली. त्याने खूप धावा केल्या, पण बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणामुळे त्याचे करिअर संपले, एखादा खेळाडू किती सहन करणार? अशा वागणुकीमुळे संघ एक उत्तम खेळाडू गमावू शकतो. प्रत्येकालाच आता संजू सॅमसनचे चे स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर, आणि विशेषत: पुल शॉट्स बघायचे आहेत.”

हे ही वाचा<< IND vs NZ: ऋषभ पंतने हर्षा भोगले यांना ऑनस्क्रीन सुनावलं, “माझा रेकॉर्ड खराब नाही, तुम्हाला तुलना करायची..”

दरम्यान, संजू सॅमसन हा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या नंतर पुन्हा मायदेशी येणार आहे, येत्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यातही त्याला संघात स्थान दिलेले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 3rd odi sanju samson doesnt play because bcci personal anger pakistan ex player angry reaction blames politics svs
First published on: 30-11-2022 at 11:44 IST