भारत आणि न्यूझीलंड संघांतील तिसरा वनडे सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे.टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक शतक झळकावले आहे. रोहित शर्मासह इंदूरच्या मैदानावर त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. शुबमन गिलने ११२ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विश्वविक्रमाशी बरोबरी केली. जो पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर होता.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम, बाबर आझमच्या नावावर होता. पण आता शुबमन गिलने त्याची बरोबरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिल ११२ धावांवर बाद झाला. तसेच तो या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३६० धावा करण्यात यशस्वी झाला.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore Match Updates in marathi
RR vs RCB : विराट कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, आयपीएलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला संयुक्त पहिला खेळाडू

बाबर आझमने २०१६ मध्ये यूएईच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ३६० धावा केल्या होत्या. त्याने तिन्ही सामन्यांमध्ये शतके झळकावली होती. आता शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द्विशतक (२०८ धावा) आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद ४९ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने शतक (११२ धावा) झळकावत विश्वविक्रमाची बरोबरी केली.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचे वर्चस्व; रोहित शर्माच्या शतकाने रचला इतिहास

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने ७८ चेंडूत १३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या. त्याने रोहित शर्मासोबत चांगली भागीदारी केली. या सामन्यातही रोहितला शतक (१०१) झळकावण्यात यश आले. शतकानंतर दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर भारतीय संघाने ४० षटकांच्या समाप्तीनंतर ५ बाद ३०० धावा केल्या.