India vs New Zealand 4th T20I Highlights: न्यूझीलंड संघाने ऑकलंडमध्ये झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा ८७ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा गोलंदाजी आणि फलंदाजी विभाग पूर्णपणे फेल ठरला. यासह आता ही पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशा गुणसंख्येवर आहे. आता अखेरचा टी-२० सामना रविवारी १ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
India vs New Zealand 4th T20I Match Highlights: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स
न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय! गोलंदाजांनंतर फलंदाजांनी टेकले गुडघे; फिलिप्स-ब्रेसवेल-डफी ठरले मॅचविनर
IND vs NZ Live: तिलक वर्मा झेलबाद
मॅथ्यू फिशरच्या १९व्या षटकात तिलक वर्मा बाद होत माघारी परतला.
IND vs NZ 4h t20i live: न्यूझीलंड विजयाच्या दिशेने
न्यूझीलंड संघाला विजयासाठी फक्त दोन विकेट्ची गरज आहे. भारतीय संघ १६ षटकांनंतर ८ बाद १४४ धावांवर खेळत आहे. तर भारताला विजयासाठी अजून ११६ धावांची गरज आहे.
IND vs NZ Live: नमन धीर कॅच
जेबक डफीच्या चेंडूवर नमन धीरने मोठा फटका खेळला, पण डॅरिल मिचेल व नॅथन स्मिथ यांनी कमालीचा रिले कॅच पकडत नमनला बाद केलं आणि भारताच्या आशांवर पाणी फेरलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीप सिंग गोल्डन डकवर झेलबाद झाला.
सँटनरचा अफलातून झेल, अक्षर तंबूत
मिचेल सँटनरने स्वत:च्याच गोलंदाजीवर अफलातून झेल टिपत अक्षर पटेलला माघारी धाडलं.
सँटनरने दूर केला नितीशचा अडसर
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला बाद केलं. सँटनरची टी२० क्रिकेटमधली दीडशेवी विकेट आहे. नितीशने २१ धावा केल्या.
IND vs NZ 4h t20i live: श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड
अॅडम मिल्नेच्या चेंडूवर श्रेयस अय्यर सहाव्या षटकात क्लीन बोल्ड झाला आणि भारताला अजून एक मोठा धक्का बसला. यासह पॉवरप्लेमध्ये भारताने ४ बाद ६१ धावा केल्या आहेत.
IND vs NZ Live: अभिषेक शर्मा तंबूत
२६० धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने तिसरी मोठी विकेट गमावली आहे. मॅथ्यू फिशरने पाचव्या षटकात अभिषेकला झेलबाद केलं. यासह भारताने ५१ षटकांत तीन विकेट्स गमावल्या आहेत.
संजू- इशान माघारी
न्यूझीलंडने दिलेल्या प्रचंड लक्ष्यासमोर खेळताना भारतीय संघाने संजू सॅमसन आणि इशान किशन यांना गमावलं आहे. जेकब डफीने या धडाकेबाज फलंदाजांना बाद केलं.
न्यूझीलंड संघाने भारताविरूद्ध चौथ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २५९ धावांचा डोंगर उभारला आहे. न्यूझीलंड संघाची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधी स्कॉटलंडविरूद्ध न्यूझीलंड संघाने २४५ धावा केल्या होत्या आणि आता २५९ धावा करत संघाने मोठा डोंगर उभारला आहे. मायकेल ब्रेसवेल व ग्लेन फिलिप्सच्या ११५ धावांच्या भागीदारीमुळे संघाने ही मोठी धावसंख्या उभारली. तर ग्लेन फिलिप्सने शतकी खेळी साकारली. यासह आता भारताला विजयासाठी २६० धावांचं आव्हान आहे. भारताला विजय मिळवायचा असेल तर इतिहास घडवावा लागला. आजवर टी-२० इतिहासात २६० धावांचं आव्हान कोणत्याच संघाने गाठलेलं नाही.
IND vs NZ Live: फिलिप्स झेलबाद
नितीश रेड्डीने अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शतकवीर ग्लेन फिलिप्स बाद होत माघारी परतला. तोपर्यंत त्याने न्यूझीलंड संघाला २५० धावांच्या पलीकडे पोहोचवलं आहे.
IND vs NZ Live: अर्शदीप सिंग १५०वी विकेट
अर्शदीप सिंगने १९व्या षटकात मिचेल सँटनरला झेलबाद करत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. टी-२० मध्ये भारताकडून १५० विकेट घेणारा तो पहिला गलोंदाज ठरला आहे.
Glenn Philips Hundred: ग्लेन फिलिप्सचं शतक
ग्लेन फिलिप्सने ४६ चेंडूत ६ चौकार व ९ षटकारांसह शतक झळकावलं आहे. फिलिप्सच्या शतकासह न्यूझीलंड संघ २४३ धावांजवळ पोहोचला आहे.
IND vs NZ Live: अर्शदीप सिंगचे सलग ३ वाईड
अर्शदीप सिंगने महत्त्वाच्या १९व्या षटकात सलग ३ वाईड चेंडू टाकले. वाईड यॉर्करच्या प्रयत्नात अर्शदीपकडून चूक झाली.
IND vs NZ 4h t20i live: प्रिन्स यादवच्या खात्यात मोठी विकेट
प्रिन्स यादव १८वं षटक टाकण्यासाठी आला होता आणि त्याने षटकातील दुसरा कमालीचा चेंडू टाकला, जो पॅडवर जाऊन आदळला आणि मायकेल ब्रेसवेल बाद झाला. ब्रेसवेल २५ चेंडूत ६५ धावा करत माघारी परतला. यासह प्रिन्सने ११५ धावांची भागीदारी तोडली.
IND vs NZ Live: मायकेल ब्रेसवेलचं वादळी अर्धशतक
मायकेल ब्रेसवेलने १९ चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह वादळी अर्धशतक झळकावलं आहे. याशिवाय फिलिप्स व ब्रेसवेलने शतकी भागीदारी साकारली असून संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेत आहेत.
IND vs NZ Live: ग्लेन फिलिप्सचे सलग चार षटकार
ग्लेन फिलिप्सने १६व्या षटकात नितीश रेड्डीच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार लगावले आणि ३२ धावा कुटल्या आहेत. यासह यजमान संघाने २०० धावांचा पल्ला गाठला आहे. तर फिलिप्स ९० धावांवर खेळत आहे.
IND vs NZ Live: मायकेल ब्रेसवेलने एका षटकात कुटल्या २० धावा
अक्षर पटेल १४वं षटक टाकण्यासाठी आला आणि या षटकात त्याने २० धावा कुटल्या. मायकेल ब्रेसवेलने या षटकात धावांचा पाऊस पाडला. अक्षर पटेल पहिल्या २ चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार व चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार लगावला. यानंतर अखेरच्या चेंडूवर फिलिप्सने मारलेला चेंडू हवेत उंच उडाला, पण झेल सुटला. यासह १४ षटकांत न्यूझीलंडने १६७ धावा केल्या आहेत.
IND vs NZ 4h t20i live: भारताच्या खात्यात चौथी विकेट
मयंक यादवने बेव्हन जेकब्सला बाद करत सामन्यातील तिसरी विकेट मिळवली आहे. ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कड घेत हवेत उंच उडाला आणि अर्शदीपने सोपा झेल घेतला. यासह ११ षटकांत न्यूझीलंड संघाने ४ बाद ११३ धावा केल्या आहेत.
IND vs NZ Live: अक्षर पटेलच्या खात्यात मोठी विकेट
अक्षर पटलेन आठव्या षटकात फिन अॅलनला बाद करत भारताला मोठी विकेट मिळवून दिली आहे. फिन अॅलनने वादळी फटकेबाजी करत अक्षर पटेलच्या षटकाची सुरूवात केली. पहिल्या चेंडूवर चौकार मग सलग दोन षटकार लगावले आणि अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फिन बाद झाला.यासह आठ षटकांत न्यूझीलंड संघाने ३ बाद ९३ धावा केल्या आहेत.
IND vs NZ 4th T20I Live: मयांक यादवने केलं डॅरेल मिचेलला बाद
आक्रमक सुरुवात केलेल्या डॅरेल मिचेलला मयांक यादवने परतीचा रस्ता दाखवला.
IND vs NZ 4th T20I Live: पहिला ब्रेकथ्रू
भारताला चौथ्या टी-२० सामन्यात पहिला ब्रेकथ्रू मिळाला आहे. टीम सायफर्ट मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद होत माघारी परतला आहे. प्रिन्स यादवने चेंडूवर नजर ठेवत एक कमालीचा झेल टिपला.
IND vs NZ Live: सामन्याला सुरूवात
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताकडून मयंक यादवने गोलंदाजीला सुरूवात केली आहे, तर न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट व फिन अॅलनची जोडी मैदानात उतरली आहे.
New Zealand Playing 11: न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन
फिन ॲलन, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हन जेकब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ॲडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर
India Playing 11: भारताची प्लेईंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव
भारत-न्यूझीलंड संघातील चौथ्या टी-२० सामन्याची नाणेफेक संघाने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यरने चारही सामन्यांची नाणेफेक जिंकली आहे. तर यजमान संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये २ मोठे बदल करण्यात आले आहेत. वैभव सूर्यवंशी व भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर केलं आहे. वैभवच्या जागी इशान किशन व भुवनेश्वरच्या जागी मयंक यादव प्लेईंग इलेव्हनमध्ये आले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड चौथा टी-२० सामना आज ३० सप्टेंबरला ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना १२.३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधीच म्हणजेच १२ वाजता होईल.

India Vs New Zealand 4th T20I: न्यूझीलंड संघाने चौथ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा दणका दिला.
