India vs New Zealand 5th T20I: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमधील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हॅमिलटनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ८ गडी बाद १९१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

Live Updates

IND vs NZ Live 5th T20I Highlights: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे हायलाईट्स

16:07 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: न्यूझीलंडचा विजय

या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ८ गडी बाद १९१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ७ गडी राखून विजय मिळवला आहे

15:49 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर! ३६ चेंडूत किती धावांची गरज?

न्यूझीलंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विजयासाठी ६ षटकांत ४२ धावांची गरज आहे.

15:23 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: सेफर्टचं अर्धशतक पूर्ण! न्यूझीलंडला विजयासाठी किती धावांची गरज?

सेफर्टने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. न्यूझीलंडला ६० चेंडूंमध्ये विजयासाठी ९६ धावांची गरज आहे.

15:07 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: सेफर्ट- मिचेलची तुफान फटकेबाजी! पावरप्लेमध्ये कुटल्या इतक्या धावा

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर सेफर्ट आणि मिचेलने तुफान फटकेबाजी करून संघाची धावसंख्या ६ षटकांत ५९ धावांवर पोहोचवली आहे.

14:42 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: इशान किशनचा भन्नाट कॅच! न्यूझीलंडला दुसऱ्याच षटकात पहिला मोठा धक्का

इशान किशनने घेतलेल्या भन्नाट कॅचच्या बळावर न्यूझीलंडला दुसऱ्या षटकात पहिला मोठा धक्का बसला आहे. फिन अॅलेन २ धावा करून माघारी परतला आहे.

14:19 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: इशान- श्रेयसचं दमदार अर्धशतक! भारताने न्यूझीलंडसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर १९१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडला विजयासाठी १९२ धावांची गरज आहे.

14:14 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: नितीश रेड्डी परतला माघारी

भारतीय संघाचे ७ फलंदाज तंबूत परतले आहेत. नितीश रेड्डी २२ धावा करून माघारी परतला आहे.

13:48 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: भारताचा निम्मा संघ तंबूत! तिलक वर्मा अवघ्या इतक्या धावा करून परतला माघारी

भारतीय संघाला पाचवा धक्का बसला आहे. तिलक वर्मा अवघ्या ६ धावांवर माघारी परतला आहे.

13:38 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: इशान किशननंतर श्रेयस अय्यरही परतला माघारी! १२ षटकांत टीम इंडियाने किती धावा केल्या?

अर्धशतक झळकावल्यानंतर श्रेयस अय्यरही बाद होऊन माघारी परतला आहे. भारतीय संघाने १२ षटकांत ४ गडी बाद १२३ धावा केल्या आहेत.

13:29 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: इशान किशन परतला माघारी

ड्रिंक्स ब्रेकनंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. इशान किशन ६१ धावा करून तंबूत परतला आहेत. भारतीय संघाची धावसंख्या (१०.२ षटकांत ३ गडी बाद ११२ धावा)

13:26 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: इशान- श्रेयसची तुफान फटकेबाजी! ब्रेसवेलच्या एकाच षटकात कुटल्या २७ धावा

इशान किशन आणि श्रेयस अय्यरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून १० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या ब्रेसवेलच्या षटकात २७ धावा वसूल केल्या.

13:20 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: इशान किशनचं अर्धशतक पूर्ण!टीम इंडियाचं दमदार पुनरागमन

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशान किशनने २८ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह भारतीय संघाने ९ षटकांत ८४ धावा पूर्ण केल्या आहेत.

12:51 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: टीम इंडियाची फ्लॉप सुरूवात! अभिषेक- संजू स्वस्तात परतले माघारी

भारतीय संघाा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सलामीला आलेला संजू ४ धावा करून माघारी परतला आहे.

12:38 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: टीम इंडियाला दुसऱ्याच षटकात पहिला मोठा धक्का! अभिषेक शर्मा स्वस्तात परतला माघारी

भारतीय संघाला या सामन्यात हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर १ धाव करून माघारी परतला आहे.

12:14 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: प्लेईंग ११

न्यूझीलंड (प्लेइंग ११): टीम सायफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवॉन जेकब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नेथन स्मिथ, ॲडम मिल्ने, जेकब डफी, ब्लेअर टिकनर

भारत (प्लेइंग ११): संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वरुण चक्रवर्ती

12:13 (IST) 1 Nov 2026

IND vs NZ Live: नाणेफेक

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे.

team india

IND vs NZ Live 5th T20I Highlights: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे हायलाईट्स