India vs New Zealand, World Cup 2023: न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमीने ऐतिहासिक गोलंदाजी केली, ज्यामुळे टीम इंडियाने हा सामना ७० धावांनी जिंकून विश्वचषक उपांत्य फेरी गाठली. वन डे फॉरमॅटमध्ये एका सामन्यात ७ विकेट्स घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला. मात्र, एवढी चांगली कामगिरी करूनही शमीला एक खंत होती, जी त्याने सामन्यानंतर व्यक्त केली.

नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (४७) आणि शुबमन गिल (८०) यांनी वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर विराटने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५०वे शतक पूर्ण करून इतिहास रचला. अय्यरने अवघ्या ७० चेंडूत १०५ धावा करत भारताची धावसंख्या ४००च्या जवळ नेली. भारताने न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते.

India vs Zimbabwe 2nd T20I Updates Cricket Score in Marathi
IND vs ZIM 2nd T20I : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, १०० धावांनी उडवला धुव्वा
Zimbabwe beat India by 13 runs in 1st T20 Match
झिम्बाब्वेची विजयी सलामी! विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ पहिल्याच सामन्यात ठरली अपयशी
Dinesh Lad shared a funny story of Rohit's
“यावेळी १०० अंडी आणून ठेवतो बघू…”, रोहित शर्माबद्दल बालपणीच्या कोचचे मजेशीर वक्तव्य, जाणून घ्या काय आहे कारण?
IND vs SA Final Score T20 World Cup 2024 Updates in Marathi
IND vs SA Final: रोहित शर्माच्या टीम इंडियाने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
Rohit Sharma's Flying Kiss Video Viral After India's Defeat of England
IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO
BCCI shares Vivian Richards in India dressing room video
IND vs BAN : “पॉकेट रॉकेट”, सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी ‘या’ भारतीय खेळाडूला दिले नवीन नाव, पाहा VIDEO
Virat Kohli Creates History, Virat Kohli Completes 3000 runs in ICC World Cup
ICC World Cup टूर्नामेंटचा ‘किंग’ ठरला विराट कोहली! विश्वचषकाच्या इतिहासात ही कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
Rohit Sharma Statement on India Win and Playing XI
IND v AFG: भारताच्या विजयानंतर प्लेईंग इलेव्हनवर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला; भविष्यातील सामन्यांमध्ये तीन गोलंदाज….

मोहम्मद शमीला न्यूझीलंडची पहिली विकेट मिळाली, त्याने दोन्ही सलामीवीरांना बाद करून चांगली सुरुवात करून दिली. त्याने डेव्हॉन कॉनवे (१३) आणि रचिन रवींद्र (१३) हे दोघेही विकेटच्या मागे झेलबाद केले. यानंतर जेव्हा डॅरिल मिचेल आणि केन विल्यमसन यांनी किवी डावाची धुरा सांभाळली तेव्हा ते खेळत असताना त्यांनी भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. पण त्यानंतर शमीने त्याच षटकात विल्यमसन (६९) आणि टॉम लॅथम (०) यांना बाद करत न्यूझीलंडला सलग दोन धक्के देत टीम इंडियात पुनरागमन केले. शमीने या सामन्यात ७ विकेट्स घेतल्या, वनडे सामन्यात ७ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

‘मी तो झेल सोडायला नको होता’, मोहम्मद शमीने सामन्यानंतर व्यक्ती केली नाराजी

मोहम्मद शमीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. जेव्हा मिचेल आणि विल्यमसन खेळत होते तेव्हा भारत संकटात सापडला होता, चाहते चिंतेत पडले होते कारण मिशेल खूप वेगवान खेळत होता. त्यावेळी धावा आणि चेंडूंचा फरक सतत कमी होत होता. दोघेही चांगली फलंदाजी करत असताना मोहम्मद शमीने विल्यमसनचा सोपा झेल सोडला. बुमराहच्या चेंडूवर विल्यमसनने शॉट खेळला, चेंडू बॅटवर पूर्णपणे आला नाही आणि तो शॉट थेट शमीच्या हातात गेला. शमीसाठी एक सोपा झेल झाला पण त्याला तो पकडता आला नाही. यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली. सामन्यानंतर शमीने हा झेल सोडल्याबद्दल खंत व्यक्त केली.

हेही वाचा: AUS vs SA Semi-Final Live: फायनलमधील भारताचा प्रतिस्पर्धी आज ठरणार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार दुसरी सेमीफायनल

सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर शमी म्हणाला, “जेव्हा तुम्ही विश्वचषकासारख्या मंचावर तुमच्या देशासाठी खेळत असता तेव्हा खूप छान वाटते. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये आम्ही सेमीफायनलमधून बाहेर पडलो होतो आणि ते खूपच निराशाजनक होते. त्यामुळे यावेळी आम्ही विश्वचषक जिंकण्याचे आमचे स्वप्न साकार करण्याची संधी म्हणून पाहिले. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुन्हा अशी संधी मिळेल की नाही हे तुम्हाला कधीच माहीत नाही, त्यामुळे हातात आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेणे महत्त्वाचे असते. तो झेल चुकवल्याबद्दल मला वाईट वाटतं, कारण दबावाच्या क्षणी माझ्या हातून तो झेल सुटला जो की सुटायला नको होता.”