India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. धरमशालेच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या स्पर्धेत विजयाच्या रथावर स्वार आहेत. दोघांनी आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंड, नेदरलँड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.

धरमशालामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कोणता संघ विजयी होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तत्पूर्वी आपण दोन्ही संघांची एकदिवसीय सामन्यात आणि आयसीसीच्‍या सामन्‍यात एकमेकांविरुद्धची कामगिरी कशी राहिली आहे जाणून घेऊया. न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी सामन्यांमध्ये भारताचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारताला १० वेळा पराभूत केले आहे. त्याचबरोबर भारताने किवी संघाचा केवळ तीन वेळा पराभव केला आहे.

Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा
Sunil Chhetri
भारताचे विजयाचे लक्ष्य! अफगाणिस्तानविरुद्ध ‘फिफा’ विश्वचषक पात्रता सामना आज; छेत्रीकडून अपेक्षा

२० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत जिंकला होता सामना –

टीम इंडियाला गेल्या २० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत सामना जिंकता आलेला नाही. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा शेवटचा पराभव केला होता. त्यावेळी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ७ विकेटने विजयी मिळवला होता. यानंतर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक २००७ आणि टी-२० विश्वचषक २०१६ सह एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ आणि टी-२० वर्ल्ड कप २०२१ च्या अंतिम फेरीत भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आयसीसी स्पर्धांमध्ये दोन दशकांपासून सुरू असलेला पराभवाचा कलंक पुसण्यात रोहित ब्रिगेड यशस्वी होईल का?

हेही वाचा – ENG vs SA, World Cup 2023: इंग्लंड संघाला बसला मोठा धक्का! रीस टॉप्लीला झाली दुखापत, सोडावे लागले मैदान

तसे पाहता, वनडेत न्यूझीलंडविरुद्ध भारताचा वरचष्मा आहे. दोघांमध्ये एकूण ११६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारताने ५८ आणि न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर ७ सामने अनिर्णित राहिले. एक सामना बरोबरीत राहिला आहे. भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध २९ सामने जिंकले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये भारत आणि न्यूझीलंड शेवटच्या वनडे मालिकेत आमनेसामने आले होते. भारताने घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा व्हाईटवॉश केला होता. या मालिकेत कर्णधार रोहितने शतक झळकावले होते. रोहितचा सलामीचा जोडीदार शुबमन गिलने शतक आणि द्विशतक झळकावले होते.