India vs New Zealand ODI Squad Update: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात असून टीम इंडियाने ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहलीसह संघातील इतर खेळाडू न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान भारताच्या संघातील वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मात्र संघाबाहेर झाला आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे; ही मालिका ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा भारत अ संघात समावेश करण्यात आला असून, तो शनिवारी (३१ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यात खेळणार आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी नितीश कुमार रेड्डीची भारत अ संघात निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेदरम्यान प्रसिद्धला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या ५० षटकांच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश होणं हे त्याच्या फिटनेस क्लिअरन्स मिळण्यावर अवलंबून होतं, पण आता संघाबाहेर आहे.
प्रसिद्ध कृष्णाशिवाय नितीश रेड्डीच्या बाबतीतही एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तो आता भारतीय संघासाठी एकदिवसीय मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये खेळणार नाही. सुरुवातीला त्याला संपूर्ण मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं होतं, परंतु आता ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यानंतर तो भारत अ (India A) संघात सामील होईल. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील तिसरा अनधिकृत कसोटी सामना ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याचाच अर्थ १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने नितीश रेड्डीला तयार करण्यास सुरुवात केली आहे.
सुधारित भारत अ संघ
यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, यश राठोड, आर स्मरण, ध्रुव जुरेल (कर्णधार,यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाशदीप, शिखर मोहन, मुकेश चौधरी, मुकेश कुमार, मानव सुथार, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी (तिसऱ्या सामन्यासाठी)
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी (फक्त पहिल्या सामन्यासाठी)
