India vs New Zealand Series Schedule: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिन्ही फॉरमॅटमधील मालिकेचं वेळापत्रक आता समोर आलं आहे. या मालिकेची घोषणा यापूर्वीच झाली होती, पण स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं नव्हतं. आता, न्यूझीलंड क्रिकेटने संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. या मालिकेदरम्यान टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळले जातील. ही एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची मालिका असणार आहे.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळवली जाणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ही मालिका होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एक मोठी मालिका खेळवली जाणार आहे. याची सुरुवात टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेने होईल. या टी-२० मालिकेत पाच सामने असतील.
टी-२० मालिकेतील पहिला सामना २२ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. तर शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना १ नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे खेळवला जाईल. याशिवाय दोन्ही संघांमध्ये तब्बल पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ४ नोव्हेंबर रोजी ऑकलंड येथे खेळवला जाईल. मालिकेतील शेवटचा सामना १५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. तर कसोटी कसोटी मालिका १९ नोव्हेंबरपासून सुरू होईल. दुसरा कसोटी सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल.
एकदिवसीय मालिका पुढील वर्षी होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वाची असणार आहे, तर कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग म्हणून खेळवली जाईल. ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असेल, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ गुणतालिकेत टॉप-५ च्या बाहेर आहे. भारताला जर अंतिम फेरीत पोहोचायचं असेल, तर त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. पण न्यूझीलंडच्या भूमीवर हे सोपे काम नसणार आहे.
न्यूझीलंड आणि भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून एकूण १२ सामने खेळतील, जो न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा दौरा ठरेल. २०१९ नंतर न्यूझीलंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा पहिला कसोटी सामना असेल. भारतापाठोपाठ, न्यूझीलंड क्रिकेट श्रीलंकन संघाचेही यजमानपद भूषवेल. या दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश असेल. संपूर्ण वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला टी-२० सामना: २२ ऑक्टोबर: क्राइस्टचर्च
दुसरा टी-२० सामना: २४ ऑक्टोबर: क्राइस्टचर्च
तिसरा टी-२० सामना: २७ ऑक्टोबर: वेलिंग्टन
चौथा टी-२० सामना: ३० ऑक्टोबर: ऑकलंड
पाचवा टी-२० सामना: १ नोव्हेंबर: हॅमिल्टन
वनडे मालिकेचं वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना: ४ नोव्हेंबर: ऑकलंड
दुसरा एकदिवसीय सामना: ७ नोव्हेंबर: वेलिंग्टन
तिसरा एकदिवसीय सामना: १० नोव्हेंबर: हॅमिल्टन
चौथा एकदिवसीय सामना: १३ नोव्हेंबर: माउंट माउंगानुई
पाचवा एकदिवसीय सामना: १५ नोव्हेंबर: माउंट माउंगानुई
संपूर्ण कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी: १९ ते २३ नोव्हेंबर: वेलिंग्टन
दुसरी कसोटी: २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर: क्राइस्टचर्च
