विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यात दुसऱ्या व्हाईटवॉशला सामोरं जावं लागलं आहे. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कोणालाही दोष द्यायचा नाही; फलंदाजांच्या खराब कामगिरीवर बुमराहचं मत

दरम्यान विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. मात्र घरचं मैदान सोडून परदेशी खेळपट्ट्यांवर खेळत असताना (विशेषकरुन इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड) विराट कोहलीची जादू चालत नसल्याचं दिसून येतंय. पाहा ही आकडेवारी…

  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१७/१८ (आफ्रिकेत खेळवली गेलेली मालिका)
  • विरुद्ध इंग्लंड, २०१८ (इंग्लंडमध्ये खेळवली गेलेली मालिका)
  • विरुद्ध न्यूझीलंड, २०२० (न्यूझीलंडमध्ये खेळवली गेलेली मालिका)

याव्यतिरीक्त विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात आणि वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजची सध्याची परिस्थिती आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती हे मुद्देही नजरअंदाज करुन चालणार नाहीत. यानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कसोटी कारकिर्दीत मयांक अग्रवालवर पहिल्यांदाच ओढवली नामुष्की