scorecardresearch

Premium

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याबाबत सौरव गांगुलीची भविष्यवाणी; म्हणाला, “जो संघ दबाव…”

Sourav Ganguly on Asia Cup: आशिया कप २०२३ जवळ आला आहे आणि भारत विरुद्ध पाकिस्तान या सर्वात महत्वाच्या सामन्याबद्दल चर्चा आता जास्त रंगू लागल्या आहेत. त्यात भारताचा माजी कर्णधार गांगुलीने या भारत वि.पाकिस्तान सामन्याबाबत भाकीत वर्तवले आहे.

Sourav Ganguly's prediction for India-Pak match Said the team that can handle the pressure well will win this match
भारताचा माजी कर्णधार गांगुलीने या भारत वि.पाकिस्तान सामन्याबाबत भाकीत वर्तवले आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Sourav Ganguly on Asia Cup: आशिया कप २०२३ जसजसा जवळ येत आहे तसतसे भारत विरुद्ध पाकिस्तान या सर्वात महत्वाच्या सामन्याबद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने २ सप्टेंबर रोजी कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा भारत-पाक सामना कोण जिंकणार? याबाबत भाकीत वर्तवले आहे.

२ सप्टेंबर रोजी होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला, “माझ्यासाठी आवडते खेळाडू निवडणे खूप कठीण आहे. ते दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. पाकिस्तान हा चांगला संघ असून ते कोणत्याही मोठ्या टीमला त्यांचा दिवस असेल त्यावेळी हरवतात. अर्थातच भारत खूप चांगला संघ आहे. या सामन्यात जो संघ चांगली कामगिरी करेल त्याला विजय मिळेल. मात्र, पाकिस्तानचा संघ हा बाबर आझमच्या नेतृत्वात सध्या चांगली कामगिरी करत आहे.”

Pakistan Team In India ICC World Cup 2023 Shadab Khan Praise Kuldeep Yadav Rohit Sharma Says Our Fats Weight Might Increase
पाकिस्तानी संघाची भारतात चंगळ! पण शादाब खानने व्यक्त केली चिंता, म्हणाला, “आमचे फॅट्स वाढून..”
Asian Games 2023: After squash India defeated Pakistan in hockey also defeated Pakistan 10-2 in a one-sided match
Asian Games, IND vs PAK Hockey: लहरा दो…! टीम इंडियापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, एकतर्फी सामन्यात १०-२ने भारताचा ऐतिहासिक विजय
Kuldeep takes five wickets against Pakistan
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर कुलदीप यादवचा वाढला आत्मविश्वास; म्हणाला, ‘मी निवृत्तीनंतरही…’
India vs Pakistan Match Highlights Video Shoaib Akhtar on Virat Kohli Kuldeep Against Afridi Babar in Asia Cup Super 4 Point Table
IND vs PAK: “भारत जिंकला तरी एका मॅचने तुम्ही पाकिस्तानला..”, शोएब अख्तरने Video मधून करून दिली आठवण

दादा (गांगुली) पुढे म्हणाला, “जसप्रीत बुमराहने आयर्लंडमध्ये उत्तम कामगिरी केली आणि ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्‍याने करिअरची सुरुवात टी२० मध्‍ये केली असून आता त्‍याला वन डेमध्‍ये १० षटके टाकावी लागणार आहेत. त्यामुळे कालांतराने त्याचा फिटनेस चांगला होत जाईल. भारत आणि पाकिस्तान सामन्यात जो संघ चांगल्या रीतीने दबाव हाताळू शकतो तोच हा सामना जिंकेल असे मला वाटते.”

हेही वाचा: World Cup: वर्ल्डकप जिंकण्यासाठी किवींची नवीन योजना, CSKला ट्रॉफी जिंकून देणारा कोच न्यूझीलंडच्या ताफ्यात दाखल

युजवेंद्र चहलला आशिया कपमधून वगळण्याबद्दल विचारले असता, माजी भारतीय कर्णधार गांगुली म्हणाला, “तुमच्याकडे फक्त तीन फिरकीपटू आहेत आणि मला वाटते की त्यांनी अक्षर पटेलला निवडून योग्य गोष्ट केली आहे कारण, तो फलंदाजी करू शकतो.” आशिया चषक २०२३ मध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचबरोबर या सामन्यादरम्यान मैदानावर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आता या सामन्यात कोणता संघ कोणावर मात करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आशिया चषकाला ३० ऑगस्टपासून पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याने सुरुवात होणार आहे. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानात खेळवले जाणार असून अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. ती २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना कँडी येथे होणार आहे.

हेही वाचा: Kapil Dev: आशिया चषकात राहुल-अय्यरच्या निवडीवर कपिल देव यांचे मोठे विधान; म्हणाले, “दोघेही फिट…”

स्पर्धेतील पहिला सामना मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे

स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे.

आशिया कपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. बॅकअप: संजू सॅमसन

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs pak gangulys prediction about india vs pakistan match told who will win avw

First published on: 25-08-2023 at 09:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×