scorecardresearch

BCCI vs PCB Asia Cup 2023: “नहीं आएं तो भाड़ में जाएं…” आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत जावेद मियाँदादने ओकली गरळ

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. आशिया चषक वाद येत्या काही दिवसात आणखी पेटू शकतो अशी चिन्ह दिसू लागली आहेत.

BCCI vs PCB: Nahin aayen to bhad mein jayne Javed Miandad rants about Asia Cup hosting
सौजन्य- (ट्विटर)

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात आशिया चषक २०२३ आणि विश्वचषक २०२३ संदर्भात वाद सुरू आहे. आशिया चषक २०२३चे आयोजन पाकिस्तानने केले आहे, तर ICC विश्वचषक २०२३ भारतात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे आणि अशा परिस्थितीत पीसीबीने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आशिया कपचे आयोजन करावे. त्याचवेळी पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी स्पष्ट केले की, जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही तर पाकिस्तानचा संघ २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादने गरळ ओकली आहे.

जावेद मियाँदाद म्हणाला, “जर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला आले नाही तर भारत नरकात जाऊ शकतो. पाकिस्तानला जगण्यासाठी भारताची गरज नाही. पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार फरीद खान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जावेद मियाँदाद यांना उद्धृत करून हे लिहिले आहे.” नजम सेठी म्हणाले की, “पाकिस्तानला आशिया चषक २०२३चे आयोजन पाकिस्तानमध्येच करायचे आहे आणि जर आशिया चषक २०२३चे ठिकाण इतरत्र हलवले गेले तर पाकिस्तान संघ २०२३च्या विश्वचषकात सहभागी होणार नाही. पीसीबी आणि बीसीसीआयमधील हे युद्ध कुठे संपणार, हे येणारा काळच सांगेल.”

जावेद मियांदाद याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) टीका केली आहे. इतकेच नाही तर भारत पाकिस्तानला नेहमीच घाबरत असल्याचा दावा जावेद मियाँदाद यांनी केला. खरेतर, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की भारतीय क्रिकेटपटू आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानात जाणार नाहीत आणि अशा परिस्थितीत आशिया चषक संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये हलवावा. बीसीसीआयला आशिया चषक २०२३चे आयोजन पाकिस्तानने करावे असे वाटते, परंतु स्थळ तटस्थ असावे. यावर पीसीबीने अशी धमकी दिली आहे की, असे झाले तर पाकिस्तान क्रिकेट संघ २०२३ च्या विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. आयसीसी विश्वचषक २०२३चे आयोजन भारत करणार आहे.

जावेद मियाँदादने भारताविरुद्ध ओकली गरळ

पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार फरीद खान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जावेद मियाँदादचा हवाला देत लिहिले, “भारत पाकिस्तानशी खेळण्यास का घाबरतो? त्यांना माहीत आहे की भारत पाकिस्तानकडून हरला तर नरेंद्र मोदी गायब होतील, त्यांची जनता त्यांना सोडणार नाही. जावेद मियाँदाद एवढ्यावरच थांबला नाही आणि पुढे म्हणाला, “आम्ही तिथे जिंकू लागलो तेव्हा भारत शारजाहून पळून गेला. त्याला खेळायचेही नव्हते. तिथले लोक आमच्याकडून हरले की त्यांच्या खेळाडूंच्या घरांना आग लावायचे. त्यांच्या गावस्करसह त्यांच्या खेळाडूंना पराभवाचा मोठा फटका सहन करावा लागला.”

हेही वाचा: IND vs AUS: अक्षर की कुलदीप, कोणाला मिळणार संधी! माजी निवडकर्त्याने केलेल्या निवडीशी तुम्ही आहात का सहमत?

जावेद मियाँदाद म्हणाले, “भारताला पाकिस्तानपासून पळून जाण्याची जुनी सवय आहे. हे काही नवीन नाही. मी त्याला माझ्या खेळण्याच्या दिवसांपासून ओळखतो. आशिया चषक २०२३ कुठे होणार आणि २०२३ च्या आयसीसी विश्वचषकातून पाकिस्तान संघ माघार घेणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच शोधणार आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 14:54 IST
ताज्या बातम्या