We didn't want to increase India's confidence, so hid it Akram's big disclosure on Indo-Pak match | Loksatta

IND vs PAK: “भारताचा आत्मविश्वास वाढू नये…” २६ वर्षापूर्वीच्या वादाला वसीम अक्रमच्या वक्तव्याने फुटले तोंड

भारत-पाकिस्तान २६ वर्षापूर्वीच्या सामन्याबाबत पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने मोठे विधान करत वादाला आमंत्रण दिले आहे.

IND vs PAK: “भारताचा आत्मविश्वास वाढू नये…” २६ वर्षापूर्वीच्या वादाला वसीम अक्रमच्या वक्तव्याने फुटले तोंड
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

वसीम अक्रम जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. दरम्यान, अक्रमने १९९६ च्या विश्वचषकाबाबत मोठा खुलासा केला आहे. अक्रमने सांगितले की, “१९९६ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत तो कसा खेळू शकला नाही, त्यामुळे आजपर्यंत टीकेला कसे सामोरे जावे लागले हे मलाच माहिती आहे.” त्यावरच आता वसीम अक्रमने तब्बल २६ वर्षानंतर याबाबत मोठे स्पष्टीकरण देत त्याने यावर भाष्य केले आहे.

पत्रकारांशी बोलताना आता अक्रमने आणखी एक खुलासा केला आहे. एका पत्रकाराने विचारले ,“कृपया सांगा अक्रम की  त्या सामन्यातून बाहेर होता आणि तुम्ही पाकिस्तानी संघाचा कर्णधारही होता.” त्यावर अक्रम म्हणाला की, “महत्वाच्या सामन्यात अशा परिस्थितीत संघाची चांगलीच निराशा झाली.” आता त्या घटनेच्या २६ वर्षे झाली असून एवढ्या वर्षांनंतर अक्रमने आणखी एक मोठा खुलासा केला असून पाकिस्तानी संघाने त्याला सामन्यातून वगळल्याची बातमी पत्रकारांपर्यंत कशी पोहोचू दिली नाही, हे ही त्याने पुढे सांगितले.

वसीम अक्रमला सामन्यापूर्वी दुखापत झाली होती

वसीम अक्रमने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी मी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान शॉट मारण्याच्या प्रयत्नात जखमी झालो. त्यामुळे मला पुढील सामन्यात खेळणे कठीण जात होते. मी न्यूझीलंडविरुद्ध ३४ धावांची इनिंग खेळली होती, त्यादरम्यान मी डीओन नॅशला स्वीप करत होतो, त्यानंतर माझ्या छातीवर ताण आला आणि डॉक्टरांनी मला सहा आठवडे विश्रांती दिली होती.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “दुखापतीबाबत आम्ही प्रेसला सांगितले नाही. आपला मुख्य खेळाडू खेळत नसल्याचा आत्मविश्वास भारताला मिळावा, अशी आमची इच्छा नव्हती. मैदानावर आल्यानंतर भारतीय संघाला आमची प्लेइंग इलेव्हनची माहिती मिळावी अशी आमची इच्छा होती. यामुळेच आम्ही दुखापतीचा तपशील मीडियासोबत शेअर केला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही लढत करो या मरो अशी झाली होती.”

हेही वाचा :   PAK vs ENG: “तबीयत ठीक नहीं है तो ५०० रन मारा, ठीक होते तो…” शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ओढले ताशेरे

अक्रम म्हणाला, “मी खूप हट्टी माणूस आहे. जर कोणी माझ्यावर अन्याय केला तर मी मनापासून त्याचा सामना करतो. मला माझी क्रिकेट कारकीर्द संपवायची नव्हती. मला पाकिस्तानसाठी खेळायचे होते तर अनेकांना मी खेळावे असे वाटत नव्हते. यानंतर माझी क्रिकेट खेळण्याची प्रेरणा आणखी वाढली.” ईएसपीएन क्रिकइन्फोशी केलेल्या संभाषणात अक्रमने या संपूर्ण वादाबद्दल सांगितले, तो कसा बाहेर पडला आणि त्याला अजूनही टीकेला सामोरे जावे लागत आहे. मी नेहमीच पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळलो आहे पण तरीही लोकांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. बाकीचे ११ खेळाडू तिथे काय करत होते ते मी विचारतो. असे सांगून अक्रमने आपले म्हणणे मांडले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 15:20 IST
Next Story
IPL 2023 Auction: ५५ खेळाडूंवर लागणार करोडोंची बोली; तर दोन-दीड कोटीच्या गटात एकाही भारतीयाला स्थान नाही