पाकिस्तानच्या कसोटी संघामध्ये तीन वर्षांपूर्वीच पदार्पण केलेला १९ वर्षीय वेगवान गोलंदाज नासीम शाह आज भारताविरुद्धच्या सामन्यातून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारताविरोधात टी-२० सामन्यामधून उजव्या हाताने गोलंदाजी करणारा शाह पदार्पण करणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे. (येथे क्लिक करुन पाहा लाइव्ह अपेडेट्स)

आशिया चषकाचा दुसरा सामना आज दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळवला जाणार आहे. शनिवारपासून या स्पर्धेची सुरुवात झाली असून पाहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय मिळवला आहे. आज अ गटातील सामना होणार असून या गटामध्ये भारत आणि पाकिस्तानबरोबरच हाँगकाँगचा संघ आहे.

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

दुसरीकडे श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या संघाचा ब गटामध्ये समावेश आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकून गटामध्ये अव्वल स्थानी राहण्याचा दोन्ही संघाचा मानस असेल. शाहिन आफ्रिदा हा दुखापतीमुळे या स्पर्धेमध्ये खेळणार नसल्याने नासीम शाहकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. नासीम हा पाकिस्तानकडून टी-२० खेळणारा ९६ वा खेळाडू असेल. त्याला टोपी देऊन सहकाऱ्यांनी त्याचं स्वागत केल्याचा व्हिडीओही पीसीबीने ट्विट केला आहे.

आपल्या पदार्पणासंदर्भात बोलताना नासीमने नुकतेच आपण एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केल्याचं सांगितलं. या महिन्याच्या सुरुवातीला नेदरलॅण्डविरुद्धच्या मालिकेमध्ये पदार्पण केलं. या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण १० विकेट्स घेतल्या. यापैकी एका सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या.

“मी नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तिथे माझी कामगिरी चांगली झाली. तुम्ही कोणत्या फॉरमॅटचा क्रिकेट सामना खेळत असता हे महत्त्वाचं नसतं कारण प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. हा फार मोठा सामना आहे,” असं नासीमने म्हटलं आहे. “आपल्या सर्वांना ठाऊक आहे की हा मोठा समाना आहे. मात्र मी या सामन्याकडे इतर सामन्यांप्रमाणेच पाहण्याचा प्रयत्न करत असून चांगली कामगिरी करण्यावर माझा जोर आहे,” असंही नसीमने म्हटलं आहे. पीसीबीने त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विटरवरुन पोस्ट केला आहे.