बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुढच्या वर्षी आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाही असे विधान केल्यापासून शेजारील देशातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या एपिसोडमध्ये आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी मोठे विधान केले आहे की, पाकिस्तान सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव संघाला भारतात जाण्याची परवानगी दिली नाही तर काय होईल? यासोबतच त्याने असेही म्हटले आहे की, आयसीसीने या प्रकरणात हस्तक्षेप न केल्याने आपण खूप निराश आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलमध्ये एका संवादादरम्यान राजीम राजा म्हणाले, “सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान सरकारने पाकिस्तानला भारतात जाण्याची परवानगी दिली नाही तर काय होईल? हा वाद बीसीसीआयनेच सुरू केला होता. याचे उत्तर आम्हाला द्यावे लागले. कसोटी क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची गरज आहे. विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान ९०००० चाहते एमसीजी मध्ये आल्याचे तुम्ही पाहिले. मी आयसीसीबद्दल थोडा निराश आहे. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा.”

हेही वाचा  : IND vs BAN: “आम्हाला कर्णधाराकडून धावांची गरज…”, भारताच्या माजी फलंदाजाने कर्णधार रोहित शर्माला दिला इशारा

दुसरीकडे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी या मुद्द्यावर म्हणाला, “पाकिस्तान आणि भारताचे संबंध नेहमीच क्रिकेटमुळे सुधारले आहेत. भारतीयांना पाकिस्तानला भारतात क्रिकेट खेळताना पाहायचे आहे. रमीज राजासह इतर अनेक पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूंनी यापूर्वी बीसीसीआय आणि भारत सरकारला विश्वचषक न खेळण्याची धमकी दिली होती. पुढच्या वर्षी आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही, तर त्यांचा संघ भारतात विश्वचषकही खेळणार नाही,” असे ते म्हणाले होते.

रमीज राजा म्हणाले होते, “भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषकात पाकिस्तानने भाग घेतला नाही, तर कोण बघणार? याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे, जर भारतीय संघ इथे (पाकिस्तान) आला तर आम्ही विश्वचषकासाठी जाऊ. जर तो आला नाही तर तो आमच्याशिवाय विश्वचषक खेळू शकतो. यावर आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे.”

हेही वाचा  : FIFA WC 2022: “मी घाबरलो होतो…” दुखापतीनंतर सावरलेल्या नेमारने शेअर केला वेदनादायी अनुभव

मी नेहमी म्हणत आलो की आपल्याला पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे आणि आपण चांगली कामगिरी केली तरच ते होऊ शकते. २०२१ च्या टी२० विश्वचषकात आम्ही भारताचा पराभव केला. टी२० आशिया चषकामध्ये आम्ही भारताला हरवले. एका वर्षात पाकिस्तान क्रिकेट संघाने एक अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या संघाला दोनदा पराभूत केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak ramiz raja changed his attitude towards the india pakistan match in world cup 2023 avw
First published on: 06-12-2022 at 14:33 IST