Rishabh Pant Viral Video Ahead of IND vs PAK: भारत आणि पाकिस्तानमधील सामने पाहण्यासाठी चाहते कायमचं मोठ्या आयसीसी टूर्नामेंटच्या प्रतिक्षेत असतात. हीच हायव्होल्टेज लढत आत ९ जूनला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पाहायला मिळणार आहे. भारत-पाकिस्तान सामना हे दोन देशच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने पाहत असतात. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या हा सामना मैदानासह सोशल मीडियावरही खेळला जातो. माजी खेळाडू असो, क्रिकेटपटू असो किंवा मग चाहते क्रिकेटप्रेमी असो प्रतिस्पर्धी संघांच्या समर्थकांना चिडवताना दिसतात. याचदरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मुलाखतीत एका चाहत्याचा डायलॉग बोलून दाखवला जो चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहत असताना चाहते विरोधी संघाची खिल्ली उडवतात. विरोधी संघावर वर्चस्व राखण्यासाठी विविध प्रकारचे डायलॉग देखील वापरले जातात. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा टी-२० मधील आणि पाकिस्तान संघाचा एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याला भारताविरूद्धच्या सामन्यात लवकर बाद करण्यासाठी चाहत्यांनी एक वाक्य तयार केले आहे ते म्हणजे “तेल लगाओ डाबर का, विकेट गिराओ बाबर का”

हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल

भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याकडून या ओळीवर प्रतिक्रिया मुलाखतीत विचारण्यात आली होती. आप की अदालत शोमध्ये पंत म्हणाला, “खेळाडूंच्या दृष्टीकोनातून बघितले तर पाकिस्तानी खेळाडूही त्यांच्या देशासाठी कठोर परिश्रम करतात. हा प्रकार सुरूच राहतो आणि गमतीची गोष्ट म्हणजे यामुळे सर्वांच्या भावना आपल्या देशासाठी भारतासाठी एकत्र येतात आणि त्यांच्या देशासाठी म्हणजे पाकिस्तानसाठीही. आपले चाहते जसे नवनवीन वाक्य तयार करत असतात जसं तुम्ही सांगितलंत आता ‘तेल लगाओ डाबर का, विकेट गिराओ बाबर का’ या गोष्टी क्रिकेटला अधिक रंजक बनवतात.”

ऋषभ पंतने १७ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर ५ जून रोजी भारताच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. २६ वर्षीय खेळाडूने पुनरागमन करताना बॅट आणि ग्लोव्हज दोन्हीसह चमकदार कामगिरी केली. शानदार झेल टिपले आणि धावबाद करण्यातही भूमिका बजावली. यासह पंतने फलंदाजी करताना नाबाद ३६* (२६) धावा करून रोहित शर्माच्या मदतीने भारताला १२.२ षटकांत ९७ धावांचे आव्हान सहज गाठून दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak rishabh pant viral video on fans chant tel lagao dabur ka wicket lo babar ka t20 world cup 2024 bdg