भारत आणि पाकिस्तानचे संघ टी -२० विश्वचषक २०२१ची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळून करणार आहेत. या आठवड्यात दोन्ही संघांमध्ये मोठा सामना आहे. टी २० विश्वचषकामध्ये – भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बऱ्याच काळानंतर हे दोन संघ एकमेकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. सुपर -१२ मधील दोघांचा हा पहिला सामना असेल. भारत आणि पाकिस्तानला गट दोन मध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने प्रत्येकी दोन सराव सामने खेळले आहेत. भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला सराव सामन्यात पराभूत केले, तर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव करताना वेस्ट इंडिजचा पराभव केला. अशा स्थितीत भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पूर्ण आत्मविश्वासाने सामना करेल. पाकिस्तानी संघ कधीही वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध विजयाची नोंद करू शकलेला नाही.

या सामन्याविषयी दोन्ही देशासह सर्व जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उस्तुकता आहे. दोन्ही संघाच्या चाहत्यांसह खेळाडूंनाही या सामन्याची तितिकीच उस्तुकता आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने लोक त्याला रविवारी मोठा सामना असल्याने तू चिंताग्रस्त आहेस, बरोबर? असे विचारत आहेत असे त्याने म्हटले आहे. त्यावर उत्तर देताना त्याने त्याचा एका टीशर्ट घातलेला फोटो पोस्ट केला आहे. त्या टीशर्टवर ‘WROGN’ असे लिहिले आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी २० विश्वचषक  सामना २४ ऑक्टोबर (रविवारी) खेळला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी सात वाजता होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना स्टार स्पोर्ट्स, एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी, एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स १ तमिळ, १ तेलुगु आणि १ कन्नडवर थेट प्रसारित केला जाईल.